.
.
.

हुशारीला कर्तुत्वाची जोड दिल्यास यशाची क्षमता अधिक -संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे

Pandharpur LIVE 20 March 2019


स्वेरीमध्ये ‘एमएचटी-सीईटी  २०१९’च्या सराव वर्गाचे थाटात उदघाटन
पंढरपूरः- ‘आपल्यामध्ये हुशारी ही देवाने दिली आहे, परंतु त्याला जर कर्तुत्वाची जोड दिली तर यशाची क्षमता अधिक असते. यासाठी आवड आहे परंतु त्या क्षेत्रात करिअर करता येत नाही अशावेळी त्या आवडीकडे केवळ छंद म्हणूनच पहावे. कारण ते करिअरला मारक ठरू शकते आणि करिअर करताना कदाचित त्या गोष्टीत आनंद मिळत नाही परंतु करिअर उत्तम ठरू शकते अशा बाबीमध्ये आवड नसतानाही अधिक परिश्रम करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे भविष्य निश्चित उज्वल होऊ शकते.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
             गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये एमएचटी-सीईटी २०१९’ परिक्षेचा सराव व्हावा या हेतूने एमएचटी-सीईटी २०१९’ सराव वर्गाचे आयोजन केले असून याच्या उदघाटन प्रसंगी  स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी हा सराव वर्ग घेण्याचा हेतू सांगताना म्हणाले की, ‘पदवी इंजिनिअरींग व पदवी फार्मसीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या एमएचटी-सीईटी २०१९’ या परीक्षा येत्या मे महिन्यात राज्यभर होणार असून याच्या गुणवत्तेच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती होणार आहे. यासाठी स्वेरीत एमएचटी-सीईटी २०१९’ चा सराव वर्ग जवळपास दीड महिना (१५ मार्च ते २७ एप्रिल २०१९पर्यंत) घेतले जाणार असून यामध्ये सीईटी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाविषयीचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे. याची वेळ सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०६.३० पर्यंत सराव वर्ग सुरु आहेत. या सराव वर्गासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर व पुणे अशा जिल्ह्यातून जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी स्वेरीत प्रवेश घेतला आहे. दरम्यात सराव परीक्षा देखील घेण्यात येणार  आहे. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ म्हणाले की, ‘विद्यार्थी अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर कंपनीमध्ये रुजू होताना विद्यार्थाना करिअरच्या दृष्ठीने आवश्यक असलेल्या बाबींसाठी प्रशिक्षण दिले जाते. कंपनीत प्लेसमेंट झालेल्याची संख्या पाहता स्वेरीचा राज्यात दुसरा तर अशासकीय महाविद्यालयात पहिला क्रमांक लागतो ‘ असे सांगून प्लेसमेंटची आकडेवारी सादर केली. 📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, ‘प्रवेश प्रक्रियामध्ये विद्यार्थ्यांचा  भरभरून प्रतिसाद असतानाही केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी व पालकांच्या पैशाची बचत व्हावी या हेतूने स्वेरीमध्ये एमएचटी-सीईटी २०१९’ सराव वर्गाचे आयोजन केले असून या संधीचा आपण अधिक फायदा करून घेताना भरघोस यश मिळवायचे असेल तर करत असलेल्या परिश्रमात सातत्य हवे. आज शैक्षणिक धोरण विस्तारले असून यासाठी शासनामार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. याचा वापर करा. गतवर्षी राष्ट्रीकृत बँकेकडून १२५ कोटी शैक्षणिक कर्ज म्हणून विना व्याजाचे राखून ठेवले होते परंतु विद्यार्थ्यांना केवळ २५ कोटी रक्कम शैक्षणिक कर्ज म्हणून दिले गेले.’ असे सांगून अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेताना नेमके काय पहावे? हे सांगून ‘आपण कुठेही प्रवेश घ्या परंतु त्या महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि महाविद्यालयाची संस्कृती या गोष्टींवर भर द्यावे.‘ असे सांगितले. तसेच शासनाची एम.एच.टी.सी.ई.टी २०१९ च्या परीक्षेची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मुदत उद्या अर्थात २३ मार्च २०१९ पर्यंत (विलंब शुल्कासह ३१ मार्च२०१९) आहे. तरी जे विद्यार्थी पदवी अभियांत्रिकी व पदवी फार्मसीला प्रवेश घेणार आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करणे अत्यंत आवश्यक आहे.व स्वेरीत याची मोफत सोय केली आहे. त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा.’ असे आवाहन देखील केले. या सराव शिबिरात सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्यासह उपप्राचार्य डॉ. डी.एम.यादव, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार. प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, प्रा. उत्तम अनुसे यांच्यासह भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, गणित व जीवशास्त्र विषयांचे तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा भुसे यांनी केले तर स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम पवार यांनी उपस्थितांचे आभार मानताना ‘प्रवेश घेलेल्या विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नका आणि वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कॅम्पस बाहेर जावू नका.’ असे आवाहन करून ‘स्वेरीला मागील वर्षाची प्रवेश संख्या पाहता सराव वर्गाची आवश्यकता नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय माफक फी मध्ये व्हावी म्हणून प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सरांनी हे सराव वर्ग जादाच्या क्षमतेसह सुरु केले.’ असे सांगितले. 


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget