दहा गावांच्या पाण्यासाठी शिवसेना आक्रमक...जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

Pandharpur LIVE 3 March 2019 


पंढरपूर,प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील दहा गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोनके येथील तिसंगी तलाव वरदान ठरतो.परंतु यंदाच्या वर्षी तलावपुर्ण क्षमतेने भरला नसल्यामुळे दहा गावांमध्ये दुष्काळाची भिषण परीस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे या दहा गावांना 3 डी मधून  पाणी देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून यावर तात्काळ कारवाईचे करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे यांनी दिले आहेत.

तालुक्यातील गादेगाव,पळशी,उपरी,वाखरी,खेड-भाळवणी,सोनके,भंडीशेगाव,कौठाळी,शेळवे व परीसरातील दहा गावांना शेती साठी तिसंगी तलावातुून पाणी सोडले जाते.दरवर्षी भाटगर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरुन पडणार्या पाण्यातून तिसंगी तलावात भरून घेतला जातो.परंतु यंदाच्या वर्षी नवख्या अधिकार्यांनी योग्य नियोजन केले नसल्यामुळे तलाव रिकामाच राहीला त्यामुळे ग्रामस्थांना तलाव भरुन घेण्यासाठी आंदोलने करावी लागली त्यानंतर अर्धा टीमसी पाणी तलावात सोडले गेले त्यातुन दहा गावांना एक पाण्याची पाळी सोडली गेली. परंतु तेथेही अधिकार्यांनी केलेल्या हलगर्जी पणामुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहीले त्यामुळे पाण्यासाठी वणवण करणार्या दहा गावातील ग्रामस्थांनी 3 डी मधूुन पाणी सोडण्याची मागणी केली आहे.उपविभागीय अभिंयंता निरा-भाटगर यांनी राष्ट्रवादी युवक कॉग्रेससह,स्वाभिमानी शेतकरी संघटना व दहा गावांमधील शेतकर्यांनी निवेदन दिले आहे.परंतु याबाबत कुठलीही हालचाल झाली नसल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


याप्रसंगी आ.तानाजी  सावंत, सोलापूर जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना घाडी, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा महीला आघाडी प्रमुख शैला शिंदे, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ढोंगे - पाटील, माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख, सांगोला तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, जयवंत माने, संजय घोडके व पदाधिकारी उपस्थित होते. ना.शिवतारे निवेदनाची   दखल घेत अधिक्षक अभियंत्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यामुळे दहा गावांना प्रशासनाने पाणी दिले दर नक्किच दुष्काळाची दाहकता कमी होणार आहे.
 तिसंगी तलाव भरण्याबाबत योग्य नियोजन केले नसल्यामुळेच तालुक्यातील दहा गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.हे संकट दुर करण्यासाठी या गावांना 3 डी मधून पाणी देण्याची मागणी आम्ही केली असून जलसंपदा राज्य मंत्री ना.विजय शिवतारे यांनी संबधित अधिकार्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.-----संभाजी शिंदे,जिल्हाध्यक्ष,शिवसेना
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget