‘ट्रेडएक्स्पो २०१९’ ला मिळाले अभुतपुर्व यश स्वेरीज् एम.बी.ए.च्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत!

Pandharpur LIVE 6 March 2019

 


पंढरपूर (संतोष हलकुडे)- सोलापूर जिल्हयातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा सहभाग असलेल्या श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम.बी.ए विभागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून मार्केटिंग विषयावरील प्रात्यक्षिकाकरिता ट्रेडएक्स्पो २०१९’ हा कृषी व ग्राहक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला अवघ्या तीन दिवसात जात्रचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील ग्राहकांनी या उपक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद दिला. प्रत्येक दिवशी ग्राहकांची संख्या वाढत गेल्यामुळे अखेरच्या दिवशी वस्तू उत्पादन कंपन्यांनी आणखी दोन दिवस वाढवून मिळण्याची मागणी केली. परंतु हा मेळावा सुनियोजित असल्याने दोन दिवस वाढविणे अशक्य असल्याचे एम.बी.ए विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी सागितले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी अत्यावश्यक असलेल्या अनुभव क्षेत्रातील या ट्रेडएक्स्पो २०१९’च्या उत्साहवर्धक मेळाव्यातून सहभागी कंपन्यामधून जवळपास दहा कोटींरुपयांपर्यंतची उलाढाल झाली असावी असा प्राथमिक अंदाज येतो. यासहभागी कंपन्यांमध्ये कृषी,खते, बी-बियाणे, कपडेज्वेलरी, गृहोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, मिठाई पासून ते टू व्हिलरफोर व्हिलर पर्यंतची वाहने विक्री व प्रदर्शनासाठी सहभागी झाले होते. चार चाकी मोठया वाहनांची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आले तर छोटी मोठी साधने, वस्तु ग्राहकांनी जागेवरच खरेदी केली. पहिल्या दिवशीच्या तुलनेत शेवटच्या दिवशी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.ट्रेडएक्स्पो २०१९’ या मेळाव्यात पासष्ट विविध कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे महत्व पटवून देत होते.


 

या ट्रेडएक्स्पो २०१९’ या मेळाव्याला तीन दिवसात जवळपास २५ हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. एकूणच ट्रेडएक्स्पो २०१९’ या ग्राहक मेळाव्याला ग्राहकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. हा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एम.बी.ए. विभागातील इतर प्राध्यापकशिक्षेकतर कर्मचारी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून ट्रेडएक्स्पो २०१९’ यशस्वी करून दाखविले. या उपक्रमाचा पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. यावेळी तीन दिवसामध्ये ग्राहकांसाठी आकर्षित करण्यासाठी कुपन योजना राबविले होते या लकी ड्रॉ मधून प्रथम क्रमांकाचे वॉशिंग मशीन हे साहिल शेख, कासेगाव यांना द्वितीय क्रमांकाचे सायकल हे पत्रकार रवींद्र लव्हेकर, पंढरपूर यांना तर तृतीय क्रमांकाचे पारितोषक असलेले होम थिएटर हे श्रुती बागल,गादेगाव यांना मिळाले. ट्रेड एक्स्पो २०१९ मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी याची सोडत स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार व तिरुपती कन्स्ट्रक्शनचे शार्दुल नलबिलवार यांच्या हस्ते काढण्यात आले. या उपक्रमातून बाहेरील जगात संवाद कसा साधायचा आणि व्यवहार कसे करावेत याचे शिक्षण एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना मिळाले. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget