.
.
.

वयोवृध्द महिलेला अरे-तुरे बोलण्याचा व मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी लढत राहणार- आ.भारत भालके

Pandharpur LIVE 17 March 2019


एका वयोवृध्द महिलेला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? याचा जाब विचारत असताना पोलिस निरीक्षक साळोखे हे माझ्या समक्षच सदर वृध्द महिलेला तुला पोलिस स्टेशनला येता येत नाही का? वगैरे अरेरावीच्या भाषेत बोलु लागल्याने मी चिडलो असे मत आ. भारत भालके यांनी आज व्यक्त केले.  माझा अतिक्रमण हटवण्यास विरोध नाही पण जर सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मी लढत राहणार असेही आ.भालके म्हणाले. 

VIDEO NEWS    


आपण महाद्वारात सर्व महिला विक्रेत्यांना जमा करण्यापुर्वी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबत एखादी मिटींग घेतली होती का?

पीएसआय विश्‍वास साळोखे यांना याआधी आपण ओळखत होतात का?

ज्यादिवशी महाद्वारात आपला वाद झाला त्या दिवशी नेमकी वाद घालण्यास सुरुवात कोणी व का केली?

यापुढे आपल्या विक्रेत्यांसाठीच्या लढ्याची आपली दिशा काय असेल?

पंढरपूर लाईव्हने विचारलेल्या या प्रश्‍नांना आ.भालके यांनी सविस्तर उत्तरे दिली. पंढरपूर पत्रकार भवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget