.
.
.

जागतीक चिमणी दिनानिमित्त पंढरीत ‘चिमणी मुलांच्या नजरेतून’ चित्रकला संकल्पना

Pandharpur LIVE 21 March 2019
पंढरपूर - 20 मार्च जागतीक चिमणी दिनानिमीत्त निसर्ग संवर्धन,पंढरपूर या संस्थेने  ‘चिमणी मुलांच्या नजरेतून’  ही अनोखी व प्रबोधन पर अशी चित्रकला संकल्पना पंढरपूर येथील तीन शाळेमध्ये राबवली. त्यापैकी  1)निवासी मूक बधिर विद्यालय व मतिमंद विद्यालय 2)यशकीर्ती विद्यालय 3)रुक्मिणी विद्यापीठ, 
या पंढरपूरातील तिन्ही शाळेतील मुलांचा चिमण्यांविषयीचा प्रतिसाद अतीशय सकारात्मक व बोलका लाभला. ‘चिमणी वाचवा’ हा संदेश देणारी चित्रकृती मुलांनी आपल्या कुंचल्यातून साकारली होती. मुलांनी विविध माध्यम वापरून जसे की, सुतळी, कापुस, पेपरक्विलींग, माती, क्राफ्ट, लोकर, रांगोळी, शिसपेंन्सील नारळाची करवंटी, धान्य अशा अनेक वस्तूंमधून मुलांनी चिऊताई साकारली. 📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com या स्पर्धेचा हेतू - आज हरवत चाललेल्या चिमणीबद्दल जनजागृती करणे व पुर्ण वेळ का होईना पण मुलांचा चिमणी कडे ओढा वाढवणे. या संकल्पनेत सर्वच शाळेतील मुला-मुलीं बरोबरच कर्णबधिर व दिव्यांग मुलामुलींनीही चिमणीची सुंदर चित्रे रेखाटली होती.विद्यार्थ्यांच्या अभुतपुर्व सहभागामूळेच ही स्पर्धा यशस्वी झाली.उत्कृष्ट कलाकृतींना विद्यार्थ्यांना ट्राफी व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी सर्व शाळांचे संचालक मंडळ,मुख्याध्यापीका व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिति व सहभाग महत्वाचा.या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहूणे म्हणुन श्री.बालाजी गडम व श्री.सतीश ईदाते यांची उपस्थीती लाभली.  आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्या साठी  निसर्ग संवर्धनचे प्रेमचंद चोले, प्रकाश शेटे, श्रीयश बिनवडे, इमरान पठाण, विनय बडवे, श्रीकांत बडवे हे उपस्थित होते. रुक्मिणी विद्यापीठ येथे चिमण्यांची घरटी बनविण्याची कार्यशाळाही घेण्यात आली.Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget