.
.
.

सही पोषण-देश रोषण अभियान राजेवाडीत यशस्वी,दहा बचत गटांनी नोंदवला सहभाग़

Pandharpur LIVE 23 March 2019

माजलगाव:- तालुक्यातील राजेवाडीत केंद्र व राज्य शासनाच्या सही पोषण- देश रोषण अभियान पंधरवाडाचे आयोजन केले होते.या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवुन हे अभियान यशस्वी केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व सहि पोषण- देश रोषण अभियानाची अमलबजावणी राजेवाडीत करण्यात आली.राजेवाडी येथे 8 मार्च पासुन पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ बचत गटाच्या अध्यक्षा मंदाकिनी शेळके यांच्या हस्ते स्त्रि शिक्षणाची जनणी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन  दिप प्रज्वलन केले.

या वेळी प्रर्यवेक्षीका किवळे मँडम, ढोले मँडम,रत्नपारखी मँडम डॉ.संदिप थेटे सचिन थेटे रायभाण सर कार्यकर्ती रंजना थोरात सह आदी उपस्थित होते.

पंधरवाडा सप्ताहामध्ये अंगणवाडी क्र 3 यांनी पुढाकार घेत अंगणवाडी क्र 1 व 2 व ग्रुप अंगणवाडी टालेवाडी यांनी अंगणवाडी क्र 3 येथे सहभाग नोंदवला.या पंधरवाडा अभियाना मध्ये बेटी बचाव बटी पढाव या विशेष कार्यक्रमास जय भवानी माध्यमीक विद्यालयातील किशोर वयीन मुले-मुलींनी सहभाग नोंदवला.या पंधरवाड्यात अंगणवाडी बालकांचे अर्धवार्शिक वाढदिवस.सायकल रँली,महिला जगतीक दिन,पल्स पोलीओ ,किशोर वयीन मुले-मुली चे पालक मार्गदर्शन मेळावा,तकडछऊअंतर्गत स्वच्छता मोहीम,अंधश्रधा, स्त्री भ्रणहत्या,बालविवाह,किशोर वयीन मुलिंचे शिक्षण आहार व आरोग्य माहिती,जनजागृती,किशोर वयीन मुलिंची तपासणी, निबंध स्पर्धा,मेंहदी स्पर्धा,पोषण पद यात्रा,पोषण मेळावा,कुपोषीत मुलांच्या मातांना माहीती,माझी कन्या भाग्यश्री व गरोदर स्तनदा माता आरोग्य विषयक समस्यावर मार्गदर्शन, किशोरी मुलिंच्या शारिरीक समस्या.दैनदिन चुकिच्या आहाराच्या पद्धती,आदी समस्येवर चर्चा करून डॉ.संदिप थेटे यानी मार्गदर्शन केले.
 या पंधरवाडा मध्ये रामेश्वर,राजमाता,विग्णहार्ता, सिध्देश्वर,जय भवानी,जिजाऊ, मातोश्री,वैष्णवी व उत्कृषा या महिला बचत गटांनी विशेष सहभाग नोंदवत झकठ पासुन बणवलेल्या पदार्धांचे स्टॉल लावले होते.या मध्ये शेव,चखली,दहीवडा,भजे,पोहे,धपाटे,वडापाव,मँगी आदी पदार्थ बणवुन विक्री केले या वेळी 2500 ते 3000 हजार रू.विक्री झाली.पंधरवाडा सप्ताहाच्या  शेवटी सहि पोषण-देश रोषणाची गावात प्रभात फेरी काढुन गावातील किशोरवयीन मुला-मुलिंसोबत सह भोजनाचे आयोजन केले होते.
 यावेळी सौ.रंजना थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सपना थोरात,रत्नमाला शिनगारे,सुशिला मेटे,वंदना पाठक,द्वारका धपाटे या अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांनी परिश्रम घेतले या वेळी मंदाकिणी शेळके,प्रतिक्षा मुळे,सुरेखा थेटे,शिला थेटे,राधा थेटे,रूक्मीन थेटे,कल्पना थेटे,किस्कींदा थेटे व आश्वीनी थेटे सह गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेवुन सहि पोषण-देश रोषण अभियान राबवुन यशस्वी केले.
कुपोषणा विरूद्ध लढा. कुपोषीत गरोदर माता/महिला, कुपोषीत बाळांचा जन्मदर स्तनदा मातांचे कुपोषणाचे प्रमान पाहता जनजाग्रृती साठी प्रभात फेरी  महिला मेळावा चे आयोजन करून मार्गदर्शन करत कुपोषना विरूद्ध लढा ऊभारला आहे.या साठी सहि पोषण- देश रोषण पंधरवडा प्रभोधनात यशस्वी झाला आहे़.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget