.
.
.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्त दान शिबिर संपन्न

Pandharpur LIVE 24 March 2019पंढरपूर , प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,माथाडी कामगारांचे अराध्य दैवत थोर मराठा कै आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच भगतसिंग,राजगुरु,सुखदेव यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने *शनिवार दि २३/३/२०१९रोजी सकाळी ९वा प्रतिमा पुजन मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,धनंजय करंडे, कैलास शिर्के, अॅड. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे भव्य रक्तदान शिबिर* *कुकाजी पाटील काॅम्प्लेक्स गांधी रोड पंढरपूर* येथे आयोजित करण्यात होते.यावेळी102 जणांनी रक्तदान केलं.  रक्त संकलन पंढरपूर ब्लड बँक यांनी केले. रक्तदात्यास कृतज्ञता म्हणून हेल्मेट भेट देण्यात  आहे.तसेच पोलीस उपनिरीक्षक(PSI)परिक्षेत उत्तिर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात  आला. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जासाठी सहकार्य केल्याबद्दल निशिगंधा सह.बँकेचे व्यवस्थापक कैलास शिर्के, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक  धनंजय करंडे यांच्यासह विविध बँक व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. मराठा महासंघाच्या पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला व युवती पदाधिकारी,कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा महासंघाचे वतीने मराठा समाजातील तरुणांना उदयोग धंद्यासाठी कर्ज प्रकरणे देत आहे।यासाठी शासन सहकार्य करत आहे। मात्र मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी येथून पुढे जे सरकार चांगला निर्णय घेईल। त्या सरकारच्या पाठीशी मराठा महासंघ ठामपणे उभारणार आहे। यात राजकारणाचा भाग नसून तरुणांच्या हितासाठी मराठा महासंघ निर्णय घेत आहे। आतापर्यंत सरकारने फसवणुकीचे धोरण राबविले आहे। जे सरकार फसवणूक करणार नाही। जे सरकार मागास विकास महामंडळाला 1 हजार कोटी देणार असतील व मराठा समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसाय,शिक्षण, नोकरी,आरक्षण,  उभारणीस हातभर लावतील।त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत। असे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले।तसेच  कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने देण्यात येत असलेल्या कर्ज प्रकरणासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर प्रकरण कर्त्यांनी पैसे देऊ नयेत. प्रकरणाकरिता पैसे देऊन स्वतःची फसवणूक करू नका. प्रकरणाबाबत काही अडचणी असतील तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी बँक व्यवस्थापक धनंजय करंडे,कैलास शिर्के यांच्यासह विविध मांण्यवरांनी आपले मार्गदर्षन पर मनोगत व्यक्त केले. 
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,संघटक सतीश धनवे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष प्रशांत नागणे, शहर अध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,उपाध्यक्ष यशवंत बागल, प्रणव गायकवाड,महेश बोडके, पांडू शिंदे,उमेश क्षीरसागर,, विकास चव्हाण,सोमा पवार,अजिंक्य पवार,महेश बेलकर,सागर पवार,नंदू पवार,अनिल जमदाडे,महिला शहर अध्यक्ष संगीता पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभावती गायकवाड, युवती तालुकाध्यक्ष अॅड प्राजक्ता शिंदें,निर्मला जाधव,रतन थोरवत,प्रशांत जाधव,सचिन जाधव,राहुल जाधव,भास्कर घायळ, दिपक खुर्द,अक्षय खुर्द,कुणाल घुले, नवनाथ मगर, आदींसह मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget