.
.
.

माढा- भाजपाकडून विजयसिंह मोहिते-पाटील निवडणूक आखाड्यात उतरण्याची शक्यता

 Pandharpur LIVE 27 March 2019


माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. मात्र, आता भाजपाच्या तिकीटावर स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे स्वत:च माढ्यातून निवडणूक आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील कुटुंबातील एका विश्वसनीय सूत्रानं ही माहिती दिली आहे. भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची भाजपामध्ये याआधीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपामध्ये प्रवेश न केलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालीय.

भाजपकडून माढा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव मागे पडलं. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे माढाचा भाजपचा उमेदवार म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र मोहिते पाटलांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.

शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी माघारी घेतली काय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खूप मोठी उलथापालथ झालेली दिसून आली. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे मित्र आणि जास्त जवळीक असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादीतही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नसल्यानं मोहिते पाटील नाराज होते.  

माढ्याच्या जागेसाठी भाजपाकडून कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता विजयदादा की रणजितदादा? या प्रदर्शनाचे उत्तर ही गुलदस्त्यातच आहे.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget