.
.
.

रांझणीच्या जिल्हा परिषद शाळेनी दिली स्वेरीला सदिच्छा भेट

Pandharpur LIVE 15 March 2019 


स्वेरीतील प्राध्यापकांच्या योगदानामुळे विद्यार्थी देशपातळीवर चमकत आहेत -मुख्याध्यापक अनिल कांबळेपंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘स्वेरीतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर केलेले ‘उत्तम संस्कार’ आणि ‘आदरयुक्त शिस्त’ याच्या भांडवलावर तयार झालेले गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी हेच स्वेरीचे नाव देश पातळीवर नेवून ठेवले असल्याचे दिसून येत आहे. येथील विद्यार्थ्यांना घडविण्यात स्वेरीच्या प्राध्यापकांचे मोलाचे योगदान लाभत आहे. म्हणूनच आमच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना आत्तापासुनच स्वेरीची ओढ लागली आहे. उच्च तंत्रशिक्षण घेवून येथील विद्यार्थी देशपातळीवर आणि प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवीत आहेत याचे संपूर्ण श्रेय संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापकांना जाते.’ असे प्रतिपादन रांझणीच्या जिल्हा परिषद प्राथमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल कांबळे यांनी केले.

      

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
  परीक्षा आणि लेक्चर या कारणांमुळे शांत असलेल्या स्वेरी कॅम्पसमध्ये आज चिमुकल्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट अधिक जाणवत होता. त्याचे असे झाले की, रांझणी (ता. पंढरपूर ) मधील जिल्हा परिषद प्राथमिक हायस्कूलचे पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळांमधील जवळपास सातशे विद्यार्थी आज उत्साहाने ‘स्वेरी’ आणि ‘स्वेरीतील शिक्षण पद्धती’ समजावून घेण्यासाठी आले होते. उत्साही मुलांनी वर्कशॉप ,अँपी थिएटर, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल, विविध विभाग, संशोधन विभाग, मध्यवर्ती वाचनालय, इंटरनेट सर्व्हर रूम आदी विभागांना भेट देवून तेथील उपस्थित प्राध्यापकांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. स्वेरीतील आपसातील सुसंवाद, शिस्त नियोजन याचा उत्तम नमुना पाहून विद्यार्थी उत्साही झाले होते. 


महाविद्यालय पाहण्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये आणल्याचे मुख्याध्यापक कांबळे यांनी सांगितले. स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांनी मुख्याध्यापक कांबळे आणि त्यांच्या शिक्षकवृन्दांचे स्वागत करून प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शून्यातून निर्माण करतात. त्यांच्यावर योग्य संस्कार करतात. एकूणच विद्यार्थ्याना घडविण्यात प्राथमिक शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून माझ्या मते प्राथमिक शिक्षकांना अधिकाधिक वेतन असावे.’यावेळी प्राथमिक शाळेचे वैष्णवी दांडगे आणि गौरव अनपट या चिमुकल्यांनी स्वेरीविषयी मनोगत व्यक्त केले. स्वेरीचे सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी आलेल्या चिमुकल्यांना सहकार्य केले. यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद श्रीमती शीला लोखंडे, श्रीमती सुलभा कोकाटे, सौ. भाग्यश्री सातपुते, श्रीमती अरुणा चौधरी, श्रीमती स्वाती डोंगरे, संजय मोरे, लहानू पवार, सुनिल कस्तुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील भिंगारे यांनी केले तर प्रा. सुनील गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget