.
.
.

प्रियंका गांधी प्रयागराज (अलाहाबादमधून) करणार निवडणूक प्रचाराची सुरुवात

Pandharpur LIVE 16 March 2019

संग्रहीत छाया
काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात प्रयागराज म्हणजे अलाहाबादमधून करणार आहेत. त्या 18 ते 20 मार्च दरम्यान प्रयागरागपासून वाराणसीपर्यंत गंगा नदी मार्गातून यात्रा करतील. यादरम्यान त्यांचे इतरही कार्यक्रमही होतील. प्रियंका गांधींच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच या दौऱ्याला काही सांस्कृतिक संदर्भही आहेत.
प्रयागराजमध्ये यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या वारशाची गोष्ट हे शहर सांगतं. पण गेल्या काही वर्षांपासून इथे काँग्रेसची पकड कमकुवत झाली आहे. प्रियंका गांधींनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे.


उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींच्या प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत नदीमार्गानं मोटारबोटच्या साहाय्यानं यात्रा करण्याची परवानगी मागितली होती. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रवक्ते झिशान हैदर यांनी बीबीसीला सांगितलं, "प्रियंका गांधी 3 दिवसांच्या यात्रेत 140 किलोमीटरचा प्रवास करतील. यादरम्यान त्या वेगवेगळे कार्यकर्ते आणि समाजातल्या वेगवेगळ्या समुहातील लोकांशी चर्चा करतील." यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 मार्चला वाराणसीच्या अस्सी घाटावर एका स्वागत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीला निघण्यापूर्वी त्या काशी विश्वनाथचं दर्शनंही घेणार आहेत.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
प्रियंका संगम तटावरून 18 मार्चला यात्रेला सुरुवात करतील. यादरम्यान त्या मार्गातील मंदिर आणि मशिदींमध्येही जातील, असं प्रदेश काँग्रेस कमिटीनं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलं आहे. प्रियंका सामाजिक संस्था यांना भेटी देतील. याशिवाय त्या धार्मिक स्थळांनाही भेट देईल. यादरम्यान अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
सरचिटणीसपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर 11 फेब्रुवारीला प्रियंका गांधी लखनऊला आल्या होत्या. तेथे रोड शो झाल्यानंतर त्यांनी 4 दिवस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद रद्द केली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम तयार आहे.

असं सांगितलं जातं की, कुंभमेळ्यात राहुल गांधी आणि प्रियंका संगम स्नानासाठी जाणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ठरू शकला नाही. पण ही शक्यता मात्र आहे की प्रियंका त्यांचा प्रचार प्रयागराज येथून करतील. प्रयागराज गांधी-नेहरू कुटुंबाचं मूळ गाव आहे आणि काँग्रेसच्या राजकारणाचा एकेकाळी गड ही होता.
प्रियंका गांधीचा हा प्रचार त्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणेल, असं जाणकारांना वाटतं. नदीच्या काठी स्थायिक असलेल्या काही पांरपरिक समाजघटकांनाही त्या भेटू शकणार आहेत. निषाद आणि मल्लाह अशा मागास जातीजमातींचे लोक मोठ्या संख्येने नदीकाठी राहतात.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget