आढळराव पाटलांनी काढली अमोल कोल्हे यांची जात! माझी जात विचारु नका...मी छत्रपतींचा मावळा! अमोल कोल्हे यांचे उत्तर

Pandharpur LIVE 5 March 2019


पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकारण सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे जातीच्या वळणावर येऊन ठेपले असून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका करत त्यांची जात काढली. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांची जात मराठा नाही तर माळी असल्याचे सांगितले आहे. शिरुर मतदारसंघात त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली.

आपल्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद पाहून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सारवासारवही केली आहे. मी जातीचे राजकारण करत असल्याची उलट सुलट राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेत कधीही जातीचे राजकारण नसते, बाळासाहेबांची शिकवण मला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणाच्याही जातीचा मी उल्लेख करत नाही. सगळ्या जाती माझ्यासाठी समान असून सगळ्यांबद्द्ल माझ्या मनात आदर आहे. जातीचे राजकारण मी कधीच केले नाही. माझ्याविरोधातील खोटा प्रचार राष्ट्रवादीने थांबवावा, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
‘काही पत्रकारांनी मला विचारलं की, शिरुर मतदारसंघात मराठा समाजाचा तगडा उमेदवार देणार अशी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आहे. मी त्यांना विचारलं असा कोण आहे मराठा समाजाच उमेदवार…यावर पत्रकारांनी अमोल कोल्हे यांचं नाव सांगितलं. मी त्यावर एवढंच म्हणालो की अमोल कोल्हे माळी समाजाचे आहेत मराठा नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे’, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.


अमोल कोल्हे यांनीही या टीकेला उत्तर दिलं आहे. माझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. माझी जात म्हणजे मी छत्रपतींचा मावळा हीच आहे असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. अमोल कोल्हे जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्वतःचा उल्लेख छत्रपतींचा मावळा आहे असा केला आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget