.
.
.

सप्तरंगात रंगले पंढरपूरकर.... यमाई तलाव ट्रॅकवर झिंग-झिंग झिंगाटच्या तालावर थिरकले अबालवृध्द

Pandharpur LIVE 27 March 2019

video News

 यमाई तलाव येथे रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला.  झिंग-झिंग झिंगाटच्या तालावर ठेका धरुन अबालवृध्द मनसोक्त थिरकले. रंगपंचमी सणाचे औचित्य साधून यमाई तलाव येथे प्रतिवर्षी प्रमाणे सुप्रभात मित्र मंडळाच्यावतीने रंगपंचमी निमित्त रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. शेकडो अबालवृद्ध या रंगोत्सवात सहभागी होऊन कोरड्या नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण करतात. 

श्री विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते श्रीकृष्णाचा मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुडलवाड उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनीही आपल्या मित्रपरिवारासह रंगपंचमीचा आनंद मनसोक्त लुटला.

याप्रसंगी वृक्ष संवर्धनासाठी सेवाभावी वृत्तीने काम केल्याबद्दल कॅप्टन विठ्ठल करंडे, दीपक थिटे,  यमाई तलावावर नित्यनेमाने चालण्यास येऊन 55 किलो वजन कमी करणार्‍या सुवर्णा भंडारे आणि एकशे दहा वेळा रक्तदान करणारे रविंद्र भिंगे यांचा श्री ढोले यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.

यमाई रंगोत्सवाचा हा नेटका सोहळा यशस्वी करण्यासाठी यमाई मित्र मंडळाचे राजाभाऊ कपडेकर, सुनील उंबरे, पांडुरंग घंटी,  राजाभाऊ उराडे, संजय बेंगलोरकर, बाबू मोरे, दौलत उंबरे, दीपक हंकारे, बालाजी गुंडेवार, सुनील येळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा कोळी चंद्रराव यांनी केले. सागर जाधव यांच्या डान्स टीमने उपस्थितांना ठेका धरायला लावला.
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget