.
.
.

आपल्या वेगाला योग्य दिशा दिल्यास फायदा होतो- ब्रम्हकुमारी शितल

 Pandharpur LIVE 26 March 2019
 स्वेरीत ‘पॉवर ऑफ माईंड’वर व्याख्यान
पंढरपूर- ‘आपण एका जागी जरी बसलो तरी आपले मन हे इतरत्र भटकंती करत असते त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनाला आवर घालणे महत्वाचे असते. जीवनातील वेगात कधीही ‘पॉवर ऑफ माईंड’महत्वाचे असते. जीवनामध्ये ‘बाल्य, युवा, ग्रहस्थ आणि वानप्रस्थ’ या चार महत्वाच्या अवस्था असून यातून जाताना आपल्याला वेग भरपूर आहे पण त्याला योग्य दिशा नसेल तर त्या वेगाचा उपयोग काहीही नाही त्यासाठी मनावर ताबा ठेवून योग्य दिशा निवडणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी शितल यांनी व्यक्त केले.
       येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टीटयूट संचलीत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना ‘पॉवर ऑफ माईंड’विषयावर ब्रम्हकुमारी शितल ह्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी विशेष अतिथी म्हणून ब्रम्हकुमारी सोनल,आणि इनोव्हेटिव्ह वास्तुनिर्माण कंपनीचे  कार्यकारी अधिकारी प्रशांत झवंर हे उपस्थित होते. प्रस्तावनेत ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ  यांनी  पाहुण्यांचा परिचय करून धकाधकीच्या जीवनात ‘पॉवर ऑफ माईंड’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज का आवश्यक आहे हे विशद केले. पुढे बोलताना ब्रम्हकुमारी शितल म्हणाल्या की, ‘आपले मन हे चंचल असून सतत विचार करत असते. मन हे भावना, भक्ती, धाडस, नम्रता, क्रोध  अशा अनेक गुणांची निर्मिती करते त्यानुसार क्रिया करते आणि त्वरीत आमलात आणते. यामुळे कधीकधी नुकसान देखील होते. एकूणच मनातील आलेल्या  विचारावर कार्य पद्धती चालतात. यासाठी प्रथम स्वतः सकारात्मक व्हा. त्यानंतर आपले सर्व विचार सकारात्मक होतील. आणि जेवढा सकारात्मक विचार असेल तेवढा फायदा अधिक होतो. कारण बाहेरील जगात सर्वप्रथम आपल्यामुळे नाहीतर आपल्या स्वभावामुळे आपल्याला प्रथम ओळखत असतात. यासाठी कधीकधी मनाच्या शांतीसाठी अनेक गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो. अनेक वेळा म्हटले जाते ‘पहिला शांत हो. त्यानंतर पाहू.’ एकूणच मनात अनेक गोष्टींची एकाचवेळी घालमेल सुरु असते. अनेक विचारांची गर्दी होते. त्यामुळे साहजिकच निर्णय घेताना विचारांची गती वाढते. गुंतागुंतीमुळे विचारदेखील दिशाहीन होतात. त्यामुळे ऐनवेळी चुकीच्या निर्णयाने नुकसान होते. यासाठी शांत मनाने विचार केल्यास अचूक निर्णय घेता येतात.आपले करिअर करताना प्रथम ध्येय ठरवा, त्यानंतर मनापासून विचार करून त्या दिशेने झेप घ्या. आपल्याला त्यात यश निश्चित मिळेल.’ असे सांगून ब्रम्हकुमारी शितल यांनी विश्वातील अनेक उद्योजकांची उदाहरणे दिली. यावेळी प्रथमवर्ष विभागप्रमुख डॉ. एस. ए. लेंडवे, यांच्यासह प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ओंकार महाजन यांनी केले तर आभार डॉ. आर.एन. हरिदास यांनी मानले.  

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget