.
.
.

चाऱ्याचे दर गगणाला भिडल्यामुळे पशुधन आले धोक्यात.. राजकीय नेते निवडणुकीत मग्न... शेतकरी हवालदिल

 Pandharpur LIVE 27 March 2019


खेडभाळवणी (रघुनाथ पवार)-  महाराष्ट्रासह सोलापुर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चाऱ्याच्या किमती सोन्याच्या दराप्रमाणे मोजावे लागत आहेत.  एकीकडे पशुधन सांभाळणे म्हटले की चारा व पाणी लागत असुन  शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठले आहेत आणि बोअरने  पाताळ  गाठले असुन  अनेकांचे  बोअरमधून पिण्यापुरते पाणी निघत आहे.  शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारखान्याच्या धुराट्या  पेटल्या होत्या तोपर्यंत जनावरासाठी वाडे  हा एक पर्याय अनेक शेतकऱ्यांसमोर होता.  कारखान्याच्या धुराट्या  थंड्यावल्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची चिंता शेतकऱ्यांना जाणवु लागली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते मंडळी लोकसभेच्या निवडणुकीत मग्न आहेत. शेतकरी मात्र हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

   मुख्यतः उन्हाळ्यामध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी हिरवा चारा हा बाबींचा तुटवडा जाणवतो जनावरांसाठी हिरवा चारा साठवून ठेवण्याची पद्धत आजही आपल्याकडे प्रचलित नसल्यामुळे आज हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न अधिक भेडसावत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा यांचे दर गगनाला भिडले असून वाळलेला मका चारा सुमारे दर 2500 ते  3000 रुपये शेकडा ,तर कडब्याचे दर 3000 ते 4000 रुपये शेकडा, हिरवा चारा मका 1300 ते 1800 रुपये गुंठ्यासाठी मोजावे लागत असून दुधाचे  दरही त्या तुलनेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि त्यामुळे मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालणे  अवघड झाले असून पशुधन वाचवण्यासाठी  तारेवरची कसरत करावी लागत आहे. आठवडे बाजारातही  जनावरांचे दर घसरले आहेत .  एकीकडे देशासह राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे प्रत्येक पक्षातील राजकीय नेते , पुढारी , कार्यकर्ते हे आपला उमेदवार हा कसा निवडुन येईल यासाठी  प्रयत्न  करताना दिसतोय पण दुसरीकडे  शेतकरी  संकटात असताना  त्याचं  गार्‍हाणे ऐकण्याकडे कोणतीच यंत्रणा सध्या  अॅक्टिव   नसल्यामुळे    शेतकरी  वर्गामध्ये  नाराजीचा सुर उमटत असुन आपले पशुधन वाचवणे हे एक मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले असून   पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हातभार लावावा असा सुर  शेतकरीवर्गातून उमटत आहे....


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget