.
.
.

स्मार्ट इंडिया हॅकॅथाॅन स्पर्धेत पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे यश

Pandharpur LIVE 20 March 2019

    पंढरपूर (प्रतिनिधी) गुवाहाटी (आसाम) येथील गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नाॅलाॅजी या नोडल सेंटर मध्ये आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकॅथाॅन-२०१९ स्पर्धेत पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी स्टॅस्टीक अँड पी. आय. या मिनिस्ट्रिच्या कक्षेतील स्पर्धेत द्वितीय क्रमांकांचे बक्षिस कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन द्वितीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.      स्मार्ट इंडिया हॅकॅथाॅन -२०१९ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातून ५५००० (पंचावन्न हजार) ग्रुप ने सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या पैकी (१४००) एक हजार चारशे ग्रुप ची निवड झाली होती. यामध्ये पंढरपूर येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन टीम ची निवड झाली होती. यातील एक टीम हैद्राबाद येथील सी.एम.आर. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये सहभागी झाले होते तर दुसरी टिम गुवाहाटी, आसाम, येथील गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नाॅलाॅजी या नोडल सेंटर मध्ये पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी स्टॅस्टीक अँड पी. आय. या मिनिस्ट्रिच्या कक्षेतील स्पर्धेत द्वितीय क्रमांकांचे बक्षिस मिळविले. यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी शुभम तांदळे, सुनिल खारे, वैभवी कुलकर्णी, पुजा गायकवाड, अबिता वावरे आणि विशाल लवटे यांचा समावेश होता. या टीम सोबत तुषार निंबाळकर सह प्रा. प्रकाश गडेकर यांनी मेंटाॅर म्हणून काम पाहिले.
ही स्पर्धा एम.एच.आर.डी., ए.आय.सी.टी.ई., प्रेसिस्टंट (persistent), रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी आणि  एम.एच.आर.डी.एस., एननोव्हेशन सेल याच्या वतीने "स्मार्ट इंडिया हॅकॅथाॅन-२०१९" हि स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमधुन भारतातील हुशार विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प सलग ३६ तास काम करून पुर्ण करायचे असतात. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी व बुद्धीमत्ता यांची परिक्षा होते आणि यातुन यशस्वी विद्यार्थी घडविले जातात. संपुर्ण भारतामध्ये ४८ नोडाल सेंटर होते. यापैकी गुवाहाटी आणि हैद्राबाद येथील सेंटर मध्ये पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची टिम सहभागी झाल्या होत्या. यामधून गुवाहाटी येथील सेंटर मध्ये सहभागी झालेल्याा पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
       या स्पर्धेत सहभागी व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. प्रकाश गडेकर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

फोटो ओळी:- स्मार्ट इंडिया हॅकॅथाॅन २०१९ मधील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. सुभाष पिंगळे व प्रा. प्रकाश गडेकर आदी.
कर आदी.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget