स्वेरीत ‘स्पिरीट २०१९’ कार्यक्रम संपन्न

Pandharpur LIVE 2  March 2019

व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या करियरला आकार मिळतो
                         - स्टडी स्मार्टचे केंद्रप्रमुख जोहेब सय्यद


पंढरपूरः सुरवातीला करिअर करताना शारीरिक व मानसिक ताण पडतो. त्यातून ज्यांचे आकलन शक्ती भक्कम असते ते अधिक परिश्रम घेत असल्याचे दिसून येतात.स्पिरीट २०१९ अशा स्पर्धात्मक कार्यक्रमातून प्रगती होते. यासाठी आपण करीयर करताना एक निश्चित ध्येय ठेवले आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आपल्याला यश मिळते. पण हे करताना आपल्यात चौकस वृत्ती देखील असावी. त्यामुळे अधिक गुणवत्ता प्राप्त होते. प्रत्येक विध्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे भक्कम मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांच्या करियरला आकार येतो.’ असे प्रतिपादन पुण्यातील स्टडी स्मार्ट ओव्हर सीजचे केंद्रप्रमुख जोहेब सय्यद यांनी केले.

        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अॅंन्ड इंजिनिअरींगच्या वतीने राज्यस्तरीय स्पिरीट २०१९ या एक दिवसीय तांत्रिक संशोधन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील स्टडी स्मार्ट ओव्हर सीजचे केंद्रप्रमुख जोहेब सय्यद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात समन्वय प्रा.एन.एस. माने यांनी स्पिरीट २०१९’ कार्यक्रमासंबंधी माहीती दिली.पाहुण्यांचा परिचय ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांनी करून दिला. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ प्रशांत पवार यांनी औद्योगीक क्षेत्रात करिअर करताना आपल्या कार्यात गुणवत्ता आणावी यासाठी अशा स्पर्धात्मक व्यासपीठाच्या बाहेरील विश्वात नेमके काय चालले आहे याची माहिती मिळते. यासाठी स्पर्धेतून मिळणाऱ्या शिक्षणाचे महत्व खूप असते. यातून आपल्या कार्यातील अचूकता व  गुणवत्ता समजते.’


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
 पुढे बोलताना केंद्रप्रमुख सय्यद म्हणाले सतत नवनवीन संधी निर्माण झाल्या की त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल हे पहावे. स्वेरीचे अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण असल्याचे दिसून येतात. एकूणच कंपनीला कसे विद्यार्थी हवे असतात त्याचा स्वेरी व्यवस्थापनाने व प्राध्यापकांनी नियोजन पूर्ण अभ्यास करून विद्यार्थी हे आमच्या कंपनीला पुरवितात आणि गुणवत्ता धारक प्रशिक्षणार्थी हे तर कंपनीच्या विकासातील महत्वाचा धागा ठरत असतात. यासाठी संधी सगळ्यांनाच मिळते परंतु ते ओळखून मिळालेल्या संधीचे सोने करायला पाहिजे.’ असे सांगून कंपनीला कशा प्रकारे विद्यार्थी हवे असतात हे सांगितले. या राज्यस्तरीय स्पर्धेत पेपर प्रेझेंटेशनसाठी स्पर्धकांना आपली गुणवत्ता व बौध्दीक वाढ यामधील कौशल्य दाखविले. संपूर्ण विभाग संगणकाच्या विविध भागाची माहिती दर्शवित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक व माहितीपूर्ण कलाकृतीची पाहुण्यांनी पाहणी करून कलेचे कौतुक केले. स्पिरीट २०१९’ या कार्यक्रमात सीआरपी,वेब डिझाईन, टेक्नो क्विझ, ब्लाईंन्ड सी, प्रात्यक्षिकवेब डिझाईन, एनएफएस, शोर्ट अॅनिमेटेड फिल्म, या व असे महत्वाचे राज्यस्तरीय इव्हेंन्टस् झाले. यातून बौध्दीक गोष्टींना चालना देणार्‍या कार्यक्रमांच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून एकूण ५८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी स्वेरीचे विश्वस्त सुरज रोंगे, राहुल मुगद्याळ, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एन. डी. कारंडे, आयकॉनचे विद्यार्थी अध्यक्ष सौरभ तेंडुलकर, उपाध्यक्षा अनिसा शेख, राज्यातून आलेले स्पर्धक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव खबानी व रिचा ताम्हाणे यांनी केले तर आभार सहसमन्वय प्रा. सुप्रिया शेगदार यांनी मानले. 


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget