पंढरपूर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Pandharpur LIVE 8 March 2019


पंढरपूर- ज्येष्ठ समाजसेवक संतोष कवडे मित्र मंडळ, नाम फाउंडेशन व समाधान (दादा) आवताडे युवा मंच पंढरपूर यांचे वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा गुरुवार दि७ मार्च २०१९ रोजी सायं.ठीक ७:०२  वाजता  शिवतीर्थ, शिवाजी चौक, पंढरपूर येथे मंगलमय आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यामध्ये एकूण बारा नवदाम्पत्याची विवाह लावण्यात आले. त्यापैकी दोन विवाह सोहळा बौद्ध धर्मीय पद्धतीने लावण्यात आले. व दहा   हिंदू पद्धतीने विवाह लावण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार व पांडुरंग कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश (तात्या) पाटील हे होते.📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे ,पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंगळवेढा तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष प्रा. येताळा भगत सरदामाजी कारखान्याचे संचालक संजय पवारसामाजिक संघटनेचे अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजेसंतोष भाऊ शिंदेविजय भाऊ श्रीरामे,नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर ,संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे,पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल जी डोके दिलीप साबळे संदीप मुटकुळेकोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी ,पत्रकार अभिराज उबाळे नगरसेवक प्रशांत शिंदेशिवक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळेगणेश अंकुशरावविनोद लटकेमहिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊतधनराज लटके ,शरद चव्हाण सरअविनाश मोरे ,शांतिनाथ बागलडॉ. साबळे, युवक नेते प्रशांत मलपे ,पत्रकार अमिन शेख ,बालम मुलाणी आधी सर्व उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष व जिथे कमी तिथे आम्ही या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक संतोष कवडे यांनी त्यांच्या मातोश्रीच्या इच्छेनुसार सदर सामूहिक विवाह सोहळ्याचे सामाजिक कार्य अखंड  करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी नेहमी सहकार्य करणारे दामाजी कारखान्याचे चेअरमन व युवक नेते समाधान (दादा) आवताडे व नगराध्यक्ष नागेश (काका) भोसले व इतर सर्व उपस्थितांचे सहकार्य केल्याबद्दल तोंड भरून कौतुक केले .हे सहकार्य असच राहावं आणि हा विवाह सोहळा वर्षानुवर्षे वाढत जावा ही अपेक्षा व्यक्त केली . यावेळी विशेष करून  पंढरपूर नगरपालिका  टांगा चालक-मालक संघटना स्पीकर सहकार्य करणारे  केटरर्स वाले व गेली सहा वर्ष  भावा सारख्या सहकार्य करणाऱ्या  माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासुन आभार मानून धन्यवाद दिले. यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथजी अवताडे यांनी तरुणाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा अशाच प्रकारच्या कार्यातून मिळत असते. आणि या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजसेवक संतोषी कवडे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार पांडुरंग कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांनी नव वधूवरांना त्यांच्या भावी जीवनात शुभ आशीर्वाद दिला .व कार्यक्रमाच्या संयोजकाचे त्यांचेही कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रकाश (तात्या) पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले  भारताचे दक्षिण काशी असलेले पंढरपूर येथे आज बारा जोडप्यांचा शुभविवाह संतोष कवडे मित्र मंडळाच्या सहकार्याने होत आहे .अशा प्रकारचे सामाजिक कार्य करण्यासाठी समाजातील तरुणांना प्रेरणा मिळते असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.सदर विवाह प्रसंगी मंगळवेढा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक भगत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागरजी कवडे यांनीही ही नवदांपत्यास भावी काळातील जिवणाला शुभेच्छा दिल्या.
शुभविवाह कार्यक्रमाच्या अगोदर धनश्री शिंदे या मुलीने" मी मुलगी आहे "या विषयी व्याख्याने दिले. सदरच्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी त्याच दिवशी दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये १५० युवकाने रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या युवकांना हेल्मेट सप्रेम भेट देण्यात आले .या कार्यक्रमाप्रसंगी वधूवरांच्या दोन्ही बाजूच्या पाहुण्यांना दिवसभर जेवणाची व्यवस्था केलेली होती. तीन ते सहा या वेळेमध्ये राजू पुरंदरे पंढरपूर यांच्या आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब तळेकर यांनी केले तर आभार अतुलजी लटके यांनी मानले.
यावेळी आपली माणसं यांचेकडून मुख्य आयोजक संतोषजी कवडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी संतोष कवडे  मित्र मंडळ, आधार प्रतिष्ठान व समाधान (दादा) आवताडे युवा मंच यातील सर्व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget