‘स्वेरी’ नाव नसून ‘ब्रँड’आहे- पालक प्रतिनिधी बाळासाहेब खिलारे

महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺

 Pandharpur LIVE 4 March 2019


स्वेरीज् बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा संपन्न

पंढरपूर- ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये प्रगती दिसून येते,त्याठिकाणच्या शिक्षणात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. शिकविण्याची पद्धतविद्यार्थ्यांच्या अपेक्षांची पूर्ततासर्व सोयी सुविधा,ट्रिपल पी.ई.प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पाठपुरावा व गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेले विविध प्रयोग आणि प्रयत्नयावर व्यवस्थापनाचे असलेले भक्कम नियंत्रण यामुळे आमच्या पाल्यांचा विकास होतो आणि यश प्राप्त होते. त्यामुळे आम्ही पालक वर्ग मनापासून समाधानी आहोत. पालकांना नेमके काय पाहिजे हे ओळखून तशी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळे ‘स्वेरी’ हे आता केवळ नाव राहिले नसून ब्रँड बनली आहे.’ असे प्रतिपादन विद्यार्थ्यांचे पालक बाळासाहेब खिलारे यांनी केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित बी.फार्मसीच्या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी  म्हणून बाळासाहेब खिलारे मार्गदर्शन करत होते. यावेळी महिला पालक म्हणून सौ. वर्षा क्षीरसागर ह्या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनानंतर प्रा.श्रीनिवास माने यांनी महाविद्यालयाची संपूर्ण माहिती आणि उपलब्ध सोयी सुविधा सांगितल्या. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असणारे कमवा आणि शिका योजनासोलार पॉवर प्लांटप्ले ग्राउंडव्यायामासाठी जिमखानाएन.के.एन.,वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ  पुस्तके,वसतिगृहातील सुविधा,वाहतुकीसाठी बस१०२४ एम.बी.पीएस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधाफीडबॅक सिस्टम तसेच औषध निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसी संबधी निगडीत सविस्तर माहिती दिली. तसेच एन.बी. ए. मानांकनाचे काम अंतिम टप्यात आले असल्याची देखील माहिती यावेळी दिली. यावेळी जी.पी.ए.टी. (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०१९ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या राहुल जाधवसुजाता वाघमोडेकुशल वांगदले व पूनम पोपेरे या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील यावेळी  सत्कार करण्यात आले. काहींनी उपस्थित केलेल्या सूचना नोंद करून घेतल्या आणि त्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सोडविल्या जातील असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी पालकांना व उपस्थितांना मार्गदर्शन करून त्यांच्या इतर प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी दामाजी महाविद्यालयाचे डॉ. अशोक माने यांच्यासह जवळपास १७५ पालकप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.स्नेहल चाकोरकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्राजक्ता खुळे यांनी मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget