मिनी एटीएम पळवणार्‍या चोराच्या परळी पोलिसांनी बांधल्या मुसक्या

Pandharpur LIVE 5 March 2019


परळी प्रतिनिधी-  परळी शहरातील गोपाळ टाकीज परिसरातून दि.21 फेब्रुवारी रोजी गोपाळ टॉकीज जवळील वैद्यनाथ मल्टिसर्व्हिसेस या दुकानातून मिनी एटीएम मशिन पळविणार्‍या चोरट्यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सदरील मशिन जप्त केली आहे. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
गोपाळटॉकीज जवळ असलेल्या वैद्यनाथ मल्टिसर्व्हिसेस येथून दि.21 रोजी मिनी एटीएम मशिन पळवून नेल्याची घटना घडली होती. याबाबत दि.25 फेब्रुवारी रोजी पवन हलगे यांच्या फिर्यादिवरुन अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दि.4 रोजी रात्री 12 च्या सुमारास परळी शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकास वैद्यनाथ मंदिर परिसरात संशयित युवक अढळला त्याची अधिक चौकशी केली असता. तो कोतरुड, ता.माजलगांव येथील असून त्याचे नांव ज्ञानेश्‍वर हरिश्‍चंद्र कदम हे आहे. 

 
सदरील एटीएम मशिन आपण चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही मशिन गोपाळटॉकीज परिसरातील नाल्यात टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणाचा कसुन शोध घेतला परंतु ही मशिन आढळून आली नाही. शेवटी नेहरु चौक परिसरातील जबदे यांच्या मोकळ्या जागेतील काटेरी झुडपात ही मशिन फेकल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणाहून मशिन जप्त केली. सदरील कारवाई ही अरिक्त पोलिस अधिक्षक बोराडे, पो.नि.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर पोलिस स्टेशन डीबी पथकाचे बालासाहेब बांगर, माधव तोटेवाड, सुंदर केंद्रे, बुड्डे यांनी केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget