.
.
.

भाजपच्या काळात शेतकरी पुरता उध्दवस्त झाला- शरद पवार

Pandharpur LIVE 24 March 2019


कराड : भाजप सरकारच्या काळात राज्यात १२ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने जनतेला धोका दिला आहे. भाजपच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाजपच्या काळात धंदे बुडाले, तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढल्याचेही पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या जाहीर सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रसेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाआघाडीची सभा झाली.
यावेळी शेतमालाला दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी स्वत:ला कांद्यात गाडून घेत आहे. शेतक-याला मदत करण्याची या सरकारची भूमिका नाही. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असल्याचे म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. मोदींकडे ५६ इंचाची छाती आहे तर कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानातून सोडवून आणण्यासाठी ती छाती का पुढे येत नाही. या सरकारने मराठा समाजाला, धनगर समाजाला, दलितांना फसवले असल्याचेही पवार म्हणाले. फसवेगिरी हेच राज्य सरकारचे वैशिष्ट्य असल्याचेही पवार म्हणाले.

शेतक-यांची बीकट अवस्था
या सभेत अच्छे दिन आले नाहीत. स्वप्न दाखवली पण ती भाजपने पूर्ण केली नाहीत. शेतकरी अवमान योजना आणली. कुणाचेही भले झाले नाही.शेतक-यांची बीकट अवस्था भाजपने केल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
भाजपने वाटेल ती आश्वासने दिली – उदयनराजे भोसले
भाजपने वाटेल ती आश्वासने दिली. त्याला जनता बळी पडली. तळागाळातल्या लोकांना गाळात घालण्याचे काम सरकारने केले असल्याचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादीत स्थानिक संदर्भानुसार मतभेद जरुर आहेत. चुकाही झाल्या आहेत. पण आता समज-गैरसमज विसरुन शेतकरी, कामगार व गरिबांना उद्ध्वस्त करणारे भाजप आघाडीचे सरकार दिल्लीतून घालवायचे आहे. यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणा-या कॉंग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून आणूया, असा निर्धार रविवारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत सर्व नेत्यांकडून करण्यात आला.
भाजप सरकारने पाच वर्षात फक्त थापा मारल्या- जयंत पाटील
देशाची राज्यघटना न मानणा-या भाजप सरकारने पाच वर्षात फक्त थापा मारल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करुन त्यांची चेष्टा केली आहे. पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले तर चातुर्वण्य व्यवस्थेकडे देशाची वाटचाल होणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. संयुक्त बैठकीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, विद्यमान खासदार धनंजय महाडिक, महापौर सरिता मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget