माढ्यातून शरद पवार लढणार नाहीत... मोहिते-पाटलांच्या नावाची चर्चा

Pandharpur LIVE 11 March 2019माढा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. 

माढ्यातील जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक झाली. विजयसिंह मोहिते-पाटलांना डावलल्यामुळे माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात माढ्याबाबत पुनर्विचार सुरु असल्याची माहिती आहे. माढयातून विजयदादांसोबतच रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.


या बैठकीला शेकाप नेते गणपतराव देशमुख, माढ्यातील आमदार बबन शिंदे, सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, कल्याण काळे उपस्थित आहेत. 

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget