महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ... "हिरकणी महाराष्ट्राची" योजनेची लातूरमध्ये यशस्वी सांगता

Pandharpur LIVE 3 March 2019मुंबई - महिलांमधील नवकल्पनांना  प्रोत्साहन देणे गरजेचे आहे आणि ही  काळाची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत "हिरकणी  महाराष्ट्राची " ही योजना २१ फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आली.
२३ फेब्रुवारीपासून ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत या योजनेचे तीनही टप्पे पूर्ण झाले असून या योजनेचा सांगता समारंभ लातूर येथे झाला.📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


"हिरकणी" नावातच एक चैतन्य आहे. धाडसीकल्पक आणि निश्चयी  महिलांचा  शोध घेणे   व त्यांच्या नवकल्पनांना योग्यरित्या विकसित  करण्याची संधी  उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना संभाजी पाटील निलंगेकर यांनी संकल्पित केली असून प्रायोगिक तत्वावर या योजनेची अंमलबजावणी लातूर जिल्ह्यात करण्यात आली. अवघ्या  दिवसांमध्ये या योजनेची लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखाली  गठित झालेल्या समितीने आज प्रत्येक तालुक्यातून एक बचत गटाची  हिरकणी म्हणून निवड केली.  प्रत्येक  बचत गटाला 2 लाख  रुपये पारितोषिक स्वरुपात दिले जाणार आहे. औसानिलंगाशिरुर अनंतपाळउदगीर, जळकोटदेवणीरेणापूरअहमदपूरलातूरचाकूर या प्रत्येक तालुक्यातून एका बचत गटाची जिल्हा स्तरावर  निवड करण्यात आली.
            हिरकणी  महाराष्ट्राची ही योजना लातूरमध्ये 3 टप्यात घेण्यात आली.
पहिला टप्पा हा माहिती सत्राचा होता ज्यात लातूर मधील प्रत्येक तालुक्यात बचत गटांना या स्पर्धेची माहिती देण्यात आली. दुसरा टप्पा हा कल्पना सादरीकरणाचा होता. प्रत्येक तालुक्यातील बचत गटांनी आपल्या नवसंकल्पना  सादर केल्या. पूर्ण जिल्ह्यातून सुमारे ७१६ बचत गटांनी संकल्पना सादर केल्या. प्रत्येक  तालुक्यातून  सर्वोत्कृष्ट 10 कल्पनांची  निवड झाली.  प्रत्येक  तालुक्यातून  निवड झालेले बचत गट लातूर येथे  होणाऱ्या  जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  पात्र ठरले  आणि त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये पारितोषिक म्हणून घोषित करण्यात आले. तिसरा टप्पा हा लातूरमध्ये जिल्हास्तरावर कल्पना  सादरीकरणाचा होता आणि तो यशस्वीरित्या पार पडला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget