.
.
.

स्वेरीच्या ‘नाईट स्टडी’चा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लाभदायी- पालक प्रतिनिधी सौ. सुवर्णा डुचाळ

Pandharpur LIVE 19 March 2019


इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पालक मेळावा संपन्न
पंढरपूर- स्वेरीमध्ये नाईट स्टडी’ हा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कार्यात एकाग्र होवून अभ्यास करतात. प्राध्यापकांच्या पाठपुराव्यामुळे, सहकार्याने स्वतःचा भाविष्यकाळ उज्वल करतात. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वेरीत नित्य राबवीत असलेल्या पंढरपूर पॅटर्न’ मुळे आमच्या पाल्यांची गुणात्मक प्रगती होत असून करिअर करण्याच्या दृष्टीने प्राध्यापकांचे परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहे .’ असे प्रतिपादन महिला पालक प्रतिनिधी सौ. सुवर्णा डुचाळ यांनी केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

      श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकीच्या इ.एन.टी.सी.अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाने आयोजिलेल्या पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून महिला पालक प्रतिनिधी सौ. सुवर्णा डुचाळ बोलत होत्या. पालक प्रतिनिधी म्हणून आप्पासाहेब वसाळे व्यासपीठावर होते. प्रारंभी प्रा. ज्योती केंदुळे यांनी शिक्षक-पालक मेळाव्याच्या आयोजनाबाबत माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांनी स्वेरीत उच्चशिक्षित व अनुभव संपन्न प्राद्यापकांमुळे व प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष यामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामुळे सोलापूर विद्यापीठात स्वेरीने उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही जपल्याचे सांगून इ.एन.टी.सी.विभागासाठी असलेले अभ्यासक्रम, उपयुक्त साधनेअवघड वाटणाऱ्या विषयांचे जादा तास, विविध शैक्षणिक उपक्रम, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याना आर्थिक मदत व्हावी म्हणून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका’ योजना, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संदर्भ पुस्तके, व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त पुस्तके, गेष्ट लेक्चर, सी.आय.पी. या व अशा अनेक शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती सांगून ‘आयुष्याला शिस्त लावायची असेल तर सर्वप्रथम स्वतःला शिस्त लावणे गरजेचे आहे.’ हे पटवून दिले. 


यानंतर भारत यलमार, लक्ष्मण पाटील, अविनाश काळे, तानाजी मोळक आदी पालकांनी मांडलेले मौलिक विचारांचे स्वागत करून त्यांच्या काही समस्या ते तातडीने सोडविल्या तर ‘संस्था पातळीवरील समस्या आणि सूचना वरिष्ठांच्या आदेशाने सोडविल्या जातील.’अशी ग्वाही देवून ‘प्रत्येक पालकांनी आठवड्यातून निदान एकदा तरी प्रॉक्टर टीचर्सकडे संपर्क साधून आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती जाणून घ्यावी.’ असेही विभागप्रमुख डॉ. विभूते यांनी आवाहन केले. या पालक मेळाव्यास जवळपास २०० पालक उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी.एम. यादव, इतर प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ललिता पलंगे व प्रा. गीता उन्हाळे  यांनी केले तर आभार प्रा. नीता कुलकर्णी यांनी मानले.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget