चांगले मित्र आणि नातेसंबध सकारात्मक आरोग्याचे लक्षण - डॉ. शेरॉन भोपटकर

Pandharpur LIVE 15 March 2019


पंढरपूर: ‘नातेसंबधातील ताणतणाव हे मानसिक आजारासाठी कारणीभूत असतात. मानसिक आजार आतून तयार होत असतात. कुटुंबातील संवाद कमी झाल्यामुळे मनमोकळेपणा कमी झाला आहे. भावनांचे नियमन करता आले पाहिजे. शक्य आणि अशक्य यामधील अंतर ओळखता आले पाहिजे. भरपूर मित्र आणि चांगले नातेसंबध सकारात्मक आरोग्याचे लक्षण आहे.’ असे विचार स्वानंद क्लिनिकच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शेरॉन भोपटकर यांनी मांडले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सी. पी. ई.अंतर्गतच्या मेडिटेशन सेंटर आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित ‘सकारात्मक मानसिक आरोग्य: तंत्र आणि मंत्र’. या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे होते.


डॉ. भोपटकर पुढे म्हणाल्या की. ‘माणसाच्या रोजच्या जीवनात अनेक ताणतणाव असतात. त्यासाठी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जीवन तणाव मुक्त करण्यासाठी रोजच्या कामाकडे सकारात्मक भूमिकेने पहिले पाहिजे जीवनातील नैराश्य टाळण्यासाठी कोणतेही काम आनंदाने करणे आवश्यक आहे. आनंद यशाचा परिणाम नव्हे तर कारण आहे. समाजासाठी दिलेल्या योगदानात आनंद मिळत असतो.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की,‘प्रत्येकाचा जगण्याचा उद्देश आनंद मिळविणे हा असतो. माणसाला मिळणारे सुख हे केवळ पैशातून मिळत नाही. खरे सुख
कामातून मिळत असते. म्हणून कामात आनंद घेता आला पाहिजे. जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मक भूमिकेने जगता आला पाहिजे. माणसाने आपल्या गरजा कमी करून पर्वताएवढ्या दुःखातून जवा एवढे
सुख मिळविल्यास जीवन आनंदी करता येते.’ यावेळी व्यासपीठावर कला विभागाचे उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, 
मेडिटेशन सेंटरचे समन्वयक प्रा. व्ही. एम. गोफणे, डॉ. एस. बी. इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे. स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. व्ही. एम. गोफणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. कु. अलका घोडके यांनी केले. मान्यवरांचे आभार प्रा. एस. बी. इंगवले यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget