कोळा बानुरगड घाटातील संरक्षक कठडे तातडीने बसवावेत~समाधान बोबडे

Pandharpur LIVE 5 March 2019


घाटातुन वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो...
कोळा/वार्ताहार
सोलापुर जिल्हातील सांगोला तालुक्यातील  सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवरील कोळा ते बानुरगड घाटातील रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे दगडी असुन नसल्यासारखे असल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या मागणीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग याकडे नेहमी दुर्लक्ष करत विभागाचा भोंगळ कारभार दिसुन येत आहे प्रशासनाने लवकरात लवकर संरक्षक कठडे बसवावेत शेवटचे दोनशे मिटर डाबरीकरण करावे अशी मागणी कोळा भागाचे सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे यांनी केली आहे.
कोळा बानुरगड मार्गावरील बानुरगड घाटात रस्त्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे व्यवस्थित नसल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे तसेच रस्त्याच्या साईड पट्ट्या भाग खचला आहे याबरोबर या घाटात अगोदर असणारे दगडी भिंतीचे संरक्षक कठडे पूर्णपणे जमीनदस्त झाले आहेत व घाटात कठडे पूर्णपणे मोकळा झाला आहे.यामुळे वाहनधारकाला वाहन चालवताना वाहन रस्त्याच्या बाजूला घेता येत नाही तर की अरुंद रस्त्यामुळे जागा पुरत नाही यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे अवघड बनले आहे या घाटात मोठमोठे डोंगर जणू अपघाताची निमंत्रण देत आहे घाटातील डोंगरावरील मोठ मोठे दगड  निसटण्याचीे शक्यता आहे  दगड रोडवर मार्गावर येऊन रस्ता बंद होण्याच्या घटना पावसाळ्यात घडण्याची शक्यता असुन प्रशासनाने उपाय योजना लवकरात लवकर कराव्यात त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे मार्गाच्या  काटेरी झाडे आहेत यामुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही तसेच हा मार्ग पूर्णपणे नागमोड आहे यातच जागोजागी वळणावर दिशादर्शक फलक नाहीत यामुळे रात्रीच्या वेळेस वाहन चालवता येत नाही व वळणाचा अंदाज येत नाही कोळा बानुरगड घाटातील मार्गाची कठड्याची समस्या प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सोडवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे यांनी केली आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com कोळा बानुरगड घाटातुन नेहमी मी येत जात असतो परंतु घाटात संरक्षक कठडे नसल्याने वळणावर झुडपे असल्याने अपघात होण्याच्या शक्यता आहे प्रशासनाने तातडीने कठडे बसवावेत
~ विनोद सय्याप्पा कोळेकर
युवा नेते कोळा

विजापुर ग्रृहागर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा कोळा गावातुन एकमेव घाटातुन जवळचा मार्ग आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष देवुन कठडे तातडीने बसवण्याची गरज आहे.
~समाधान बोबडे
सामाजिक कार्यकर्ते कोळा
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget