स्वेरीज् डी. फार्मसीमध्ये पालक मेळावा संपन्न

Pandharpur LIVE 5 March 2019


स्वेरीमध्ये प्रवेश मिळणे हे पूर्वजन्माचे पुण्य म्हणावे लागेल - पालक अध्यक्ष मुकुंद गावंधरे

पंढरपूर- या ठिकाणी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि प्राणायामाद्वारे आरोग्य उत्तम लाभत आहे म्हणून आमच्या पाल्यांना यश मिळत आहे या ठिकाणी एक तर नंबर लागत नाही आणि लागलाच तर ते पूर्वजन्माचे पुण्य म्हणावे लागेल अशी अवस्था आहे.’ असे प्रतिपादन पालक अध्यक्ष मुकुंद गावंधरे यांनी केले.

       येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित डी. फार्मसीच्या पालक सभेच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून गावंधरे बोलत होते. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून योगेश बेसुळके तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. शुभांगी महाजन हे देखील उपस्थित होते. प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांनी पालकांचे स्वागत केले. दीप प्रज्वलनानंतर प्रा. पी.ए.पाटील यांनी महाविद्यालयाची संपूर्ण माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असणारे कमवा आणि शिका योजनाप्ले ग्राउंड,जिमखानाएन.के.एन.प्रणालीवाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेची पुस्तकेवसतिगृहातील सुविधा,वाहतुकीसाठी बस१०२४ एम.बी.पीएस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधाफीडबॅक सिस्टम तसेच उच्चशिक्षित शिक्षकवर्गरात्र अभ्यासिकाउपलब्ध रसायने आदी फार्मसी संबधीची सविस्तर माहिती दिली. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com तसेच गतवर्षीच्या परीक्षेत अव्वल आलेले वैभवी खारगे, सोनाली लोंढे, वासुदेव कोळी, तसेच दिपाली अटकळे, विद्या पवार व प्रेरणा ढवळे  या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांकडून सत्कार करण्यात आले. यावेळी सोनाली जगताप यांनी महाविद्यालयावर मनोगत व्यक्त केले. यातून शिक्षक कसे असावे आणि विद्यार्थी कसा असावा? याबाबत सुंदर विवेचन केले. याच बरोबर सुरेश कोळी, दिलीप जाधव, दिलीप गायकवाड या पालकांनी काही सूचना आणि प्रश्न उपस्थित केल्या. त्याचे प्राचार्य मांडवे यांनी जागेवरच प्रश्न सोडविले. पालक योगेश बेसुळके म्हणाले की, ‘ शिक्षण तर सर्वच जण देतात परंतु संस्कार आणि शिस्त फक्त याच स्वेरी महाविद्यालयातून मिळते. यासाठी याठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा लागते आणि  भविष्यासाठी विध्यार्थ्यांवर होत असलेले संस्कार फलदायी आहेत. सौ महाजन म्हणाल्या, ‘आपल्या शिक्षण पद्धतीतून सर्वांचा विकास होत असताना परिश्रम करण्याची सवय विद्यार्थ्यांना जडते. ही बाब खूप महत्वाची आहे. तसेच येथील शिकविण्याची पद्धत,विद्यार्थ्यांच्या अपेक्षांची पूर्तता, सर्व सोयी सुविधा, ट्रिपल पी.ई., प्राद्यापकांचा अभ्यासासाठी पाठपुरावा व गुणवत्ता वाढीसाठी सततचे प्रयत्न, हे देखील खूप महत्वाचे आहे. यावेळी प्राचार्य प्रा. मांडवे यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास १२० पालक, तसेच प्रा. एम. आय. मुजावर, इतर प्राध्यापक वर्ग, नवनाथ बंडगर. विजय बोबडे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.प्रियांका कापसे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले तर प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांनी उपस्थितांचे आभार  यांनी मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget