मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही

Pandharpur LIVE 26 March 2019


मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट करीत मोर्चासाठी परिश्रम घेणारा कुणी समाजबांधव निवडणुकीत अपक्ष उभा असल्यास त्याच्या मागे उभे राहा, असे आवाहन येथे करण्यात आले. अन्य कोणत्याही मोर्चाचा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
आगामी निवडणुकीत क्रांती मोर्चाची भूमिका काय असावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता. २४) येथे बैठक झाली. या वेळी उपस्थितांनी मते मांडली. कुठल्याही पक्षाने समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी प्रयत्न केले नाहीत. मोर्चात समाज म्हणूनच विविध पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांनी सहभाग नोंदविला; मात्र प्रश्न सुटले नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे, अशी खंत समन्वयकांनी मांडली.
मोर्चाचा कुणीही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करू नये, समाजाच्या प्रश्नांची दाहकता सरकारला कळावी म्हणून अनेकांनी बलिदान दिले. बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळाली का, असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला, संघटनेला, उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नसेल.



📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 



Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget