स्वेरीच्या डिप्लोमा कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेल्या सॉफ्टवेअरला पन्नास हजारांचे पारितोषक

Pandharpur LIVE 15 March 2019पंढरपूर- संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजअतीग्रे,कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई. बोर्डप्रायोजित ‘प्रोजेक्ट कॉम्पिटीशन’ प्रकारामध्ये पंढरपुरच्या श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) च्या प्रोजेक्टने उपविजेतेपद पटकावले. उपविजेते पदासाठी रुपये पन्नास हजार चे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह असे पारितोषिक होते. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची प्रायोजकता असलेले पोलीस दलाचे ‘अँड्रॉइड सॉफ्टवेअर’ हे स्वेरी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तयार केले असून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वारी बंदोबस्त व इतर सर्व प्रकारचे बंदोबस्त या सॉफ्टवेअर च्या मदतीने अत्यंत सुलभ पद्धतीने पार पाडता येत आहेत.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

दरम्यान २४ डिसेंबर रोजी झालेल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी पंढरपूर पोलीस दलाकडून या सॉफ्टवेअरची पहिली चाचणी घेण्यात आली तर या सॉफ्टवेअरची दुसरी यशस्वी चाचणी मागील महिन्यात झालेल्या माघी वारी बंदोबस्ताच्या निमित्ताने घेण्यात आली. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याचे ठिकाण अगदी सहजतेने पाहता येते शिवाय बंदोबस्ताविषयीच्या संबंधित अनेक बाबी अधिकारी व कर्मचारी वर्गाला समजतात शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी क्यु.आर.कोड वर आधारीत ओळख पत्राच्या माध्यमातून लावता येते. कर्मचाऱ्यांना या सॉफ्टवेअरद्वारे आपली हजेरीटीममहत्वाच्या सूचनात्यांचे बंदोबस्त अधिकारी व अशा अनेक गोष्टी सहज पाहता येतात. या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने स्वेरी कॉलेजच्या माध्यमाने जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना क्यु.आर.कोड आधारित ओळखपत्र दिलेले आहेत. हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनोज पाटीलउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी मार्गदर्शन केले. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रा. सोमनाथ झांबरेप्रा. अवधूत भिसेप्रा. अमेय भातलवंडे, प्रा. प्रशांत भंडारे व प्रा. अश्विनी पालकर यांच्या सहकार्याने डिप्लोमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे सिद्धेश खडकेतेजस पाटीलऋषिकेश कोरडेयशराज चव्हाणप्रज्वल बेंडाळेअभिषेक वरपे, अथर्व रुपलग, रोहित कोंडे, धवल द्यावनपल्ली, हर्षद कमले, सोहेल मुलाणी, ओंकार माळी अक्षय मलपे या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट पूर्ण केला. या अगोदर याच सॉफ्टवेअरसाठी पुणेसोलापूरकोल्हापूर या जिल्ह्यातील इतर कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट कॉम्पिटीशन’ मध्ये चार वेळा विविध ठिकाणी पारितोषिके मिळाली असून या उपविजेत्या पारितोषकासह एकूण सदुसष्ट हजार रुपयांची रोख पारितोषके मिळाली आहेत. प्रोजेक्टमधील विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे पदाधिकारी व सर्व विश्वस्त, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी  यांनी संपूर्ण प्रोजेक्ट टीमचे अभिनंदन केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget