'' जगणं विस्तवावरलं" कादंबरीचे प्रकाशन थाटात संपन्न.

Pandharpur LIVE 5 March 2019


         शेळवे ता.पंढरपूर जि. सोलापूर येथे भगवंत प्रतिष्ठान तर्फे कवयित्री व लेखिका कु.शितल  गाजरे यांच्या ''जगणं विस्तवावरलं '' या आत्मचरिञात्मक  कादंबरीचे प्रकाशन अगदी थाटात संपन्न झाले.
     कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ८ ते १० :३० पर्यंत किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.यात ह भ प योगेश महाराज, आळंदी यांनी सुंदर रित्या किर्तनाचा कार्यक्रम फुलवला.त्यानंतर दुसऱ्या सत्रात भव्यदिव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा पार पडली.या  स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी व कवयित्री हजर राहिले होते.यात एकूण ९० कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.सदर काव्यस्पर्धेसाठी बक्षिस पुढील प्रमाणे होते, प्रथम १०,००० रु ,द्वितीय ७००० रु ,तृतीय ५००० रु ,चतुर्थ ३००० रु ,उत्तेजनार्थ ५०० रु ,300रु,100रु व अनुक्रमे सन्मानचिन्ह ,सन्मानपञ  अशा प्रकारे बक्षिसे होती.या काव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील नवकवी तसेच जेष्ठ कवी यांनी रंगत आणली.
        शेवटच्या सत्रात कवयित्री कु.शितल गाजरे यांच्या "जगणं विस्तवावरलं" या कादंबरीचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम भोरे (अध्यक्ष नारायण सुर्वे कला साहित्य मंच),प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम सदाफुले (कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी),दिगंबर ढोकले (प्रमुख कार्यवाहक साहित्य परिषद भोसरी),ज्येष्ठ कवी अनिल दिक्षित(झिंगाट फेम),जेष्ठ कवी राजेंद्र वाघ व गझलकार राधिका फराटे हे आवर्जून ऊपस्थित  होते.व्यासपीठावर कवयित्री शितल गाजरे , वडील सत्यवान गाजरे,आई मंदांकिनी  गाजरे  उपस्थित होते.पुरुषोत्तम सदाफुले यांनी  शितल हिचे बालवयातील या धाडसी आणि करारी पणाचे तोंडभरून कौतुक केले.कविता ही उपजत असली पाहिजे,अस्वस्थ झाल्याशिवाय कविता जन्मत नाही. कविता ही परिवर्तनाचे साधन आहे.काळीज फाटल्याशिवाय कविता जन्म घेत नाही .शितल हिने बालवयातच आपल्या वडिलांचा जीवनसंघर्ष तिच्या या कादंबरीत मांडला  आहे आणि तिचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे .
       

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

राज्यस्तरीय काव्यस्पर्धा मधील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक महादेव कांबळे(सांगोला) यांना मिळाला.द्वितीय क्रमांक सूर्याजी भोसले पंढरपूर) व गौसपाक  मुलाणी(सांगोला) यांना मिळाला.तृतीय क्रमांक सिद्धेश्वर इंगोले व रोहित शिंगे (इचलकरंजी ) यांना विभागून देण्यात आला .चतुर्थ क्रमांक अमोल मसलखांब(पुणे) व अंकुश आरेकर (सोलापूर) यांना देण्यात आला.पंचम क्रमांक विकास जगताप (औरंगाबाद) व चंद्रवर्धन लांडगे (सांगली) यांना मिळाला.तसेच उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे विजय बल्लूर (रत्नागिरी),कविता काळे( पुणे ),सुराज काळे (सोलापूर) यांना मिळाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गझलकार अनंत राऊत ,रविराज सोनार ,शिवाजी बंडगर यांनी काम पाहिले .
       कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या व नियोजित पणे पार पडला.आयोजक सत्यवान गाजरे व सदाशिव पोरे यांनी कार्यक्रमाची खूप योग्यरीत्या नियोजन केले.तसेच कार्यक्रमासाठी अजय ञिभुवन,गणेश पाटील ,महेश जाधव , जालिंदर बरबङे,अमोल पाटील ,विजय वाठोरे ,विजय बिलुर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदर्शन साखरे तर आभार प्रदर्शन नवनाथ खरात यांनी व्यक्त केले.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget