कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट

Pandharpur LIVE 15 March 2019


सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीने कोल्हापूर परिक्षेञाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांचा सत्कार करताना सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक सोमनाथ नवले.
    पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येेेथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड इन्स्टिट्यूटला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी सदिच्छा भेेट दिली.  
 नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर सह पंढरपूर येथील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले असताना कोल्हापूर परिक्षेञाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके यांनी बुधवारी कोर्टी येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांचा सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीने इन्स्टिट्यूटचे संचालक सोमनाथ नवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 


      यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सिंहगड इन्स्टिट्यूटचे योगदान खुप उत्कृष्ट असुन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देऊन उत्तम शिक्षण देण्याचे काम सिंहगड संस्था करीत असल्याचे मत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.      

   या वेळी सोलापूरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पंढरपूर येथील पोलिस उपअधिक्षक डाॅ. सागर कवडे सह अनेक पोलिस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 



Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget