.
.
.

राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्घाटन

Pandharpur LIVE 28 March 2019

दुरावलेल्या मनाला कुस्तीची जोड हवी...! डॉ. रामनाथ सोनावणे यांचे प्रतिपादन; ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन

 पुणे- “खेळातून युवा पिढींचा व्यक्तिमत्व विकास होऊन त्यांच्यात निरपेक्षता हे मूल्य रूजले जाते. त्यामध्ये कुठलाही जाती , धर्माचा लवलेश ही येत नाही. कुस्तीपट्टुंमध्ये चळपता, निर्णय क्षमता आणि डावपेच  हे गुण असावे लागतात.  कुस्ती या खेळामुळे दुरावलेली मने जोडण्याचे कार्य घडत आहे,  असे प्रतिपादन नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल विकास प्राधिकरण मर्या.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनावणे यांनी केले.


विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर येथे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती-राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा-२०१९’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हिंदी केसरी दिनानाथ सिंग हे  सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. 


यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे श्री. विलास कथुरे, पै. नागनाथ देशमुख, रामेश्‍वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी श्री. काशीराम दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री. रमेशअप्पा कराड, डॉ. हनुमंत  तु. कराड,  नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण,  श्री. राजेश कराड, श्रीकांत देशमुख,  डॉ. आवळे, व कमाल राजेखाँ पटेल हे ही यावेळी उपस्थित होते.

अबर्ट आइन्स्टाइन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून जगाला वेगळी दिशा दिली. जगात शांतता नांदावी या सिद्धातांने महत्वाची भूमिका बजावली. सद्धाचे जग स्थित्यांतचे आहे. बदलत्या काळात मानवी कल्याणासाठी व विश्‍वशांती सांठी सापेक्षतावादासारखाच निरपेक्षतावादाचा सिद्धात मांडला जावा. आणि जगाला विश्‍वशांती प्रदान करावी.”

“समाजात आज जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झालेले आहे. त्यासाठी मानवता, सर्वधर्म समभाव आणि विश्‍व कल्याणाचा पुरस्कार केला पाहिजे.  जगात शांतता नांदावी यासाठी विविध जाती धर्माच्या पंथाच्या साधू संतांनी संदेश दिला. संत ज्ञानेश्‍वरांनी , संत तुकाराम या सह  अबर्ट आइन्स्टाइन यांनी मानव कल्याणासाठी सिद्धात मांडले. भक्ती हा त्याचा एक प्रमुख मार्ग आहे. कीर्तन, मनन ,चिंतन या ९ मूल्यांसह मानवसेवा हे  १० मूल्य आहे हे नव्याने काळले. मानव सेवा हीच ईश्‍वर सेवा या तत्वाने समाज सेवेचे कार्य अविरत पणे करत रहावे.”
दिनानाथ सिंग म्हणाले,“ रामेश्‍वर या गावाने लाल मातीतील कुस्तीची परंपरा जपली आहे. ही परंपरा अशीच अविरतपणे सुरू रहावी. महाराष्ट्रात आणि देशात मातीतील गुणवंत मल्ल घडवेत व देशाला नावलौकिक मिळून द्यावा. लाल मातीतील कुस्त्या भरविल्यामुळे ग्रामीण भागातील मल्लांना प्रोत्साहन मिळत आहेत.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ तेरा वर्षापूर्वी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ देशातील ११ हिंद केसरी यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्ट्रातील मल्लांना एक व्यासपीठ मिळून देण्यासाठी या स्पर्धांनी महत्वांची भूमिका बजावली आहे. या मातीने देशाला अनेक गुणवंत मल्ल दिले. २१ व्या शतकात भारत विश्‍वगुरू बनेल याचे प्रतीक म्हणून लाल मातीतील कुस्तीकडे पाहिले जाईल.
श्रीकांत देशमुख म्हणाले देशाला आरोग्य संपन्न  बनवण्यासाठी कुस्ती हा एक महत्वपूर्ण खेळ आहे. मन, मनगट आणि मस्तिष्क मजबूत करणार्‍या या खेळाला सोन्याचे दिवस आले आहे. समाजातील तरुण पिढी निर्वेसनी व्हावी यासाठी कुस्तीला महत्व द्यावे.  

शुभारंभाची कुस्ती खुल्या गटात सांगलीचा मल्ल सतीश मुंडे आणि कोल्हापूरचा मल्ल विनायक पाटील यांच्या झाली. त्यामध्ये सतीश मुंडे विजयी झाला. तसेच, रामेश्‍वर येथील मल्ल प्रसाद शिंदे आणि वैभव शिंदे यांच्यातही ८६ किलो वजनी गटातील शुभारंभाची कुस्ती झाली. यामध्ये मल्ल प्रसाद शिंदे विजयी झाला. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो मल्लांनी भाग घेतला आहे.
प्रस्ताविक करताना प्रा राहुल कराड म्हणाले, राज्य व देशासाठी मल्ल तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या कुस्ती स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी आभार मानले. प्रा. गोविंद जाधव यांनी सुत्रसंचालन केले. 

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget