" जगातील सगळ्यात मोठे डेस्क कॅलेंडर पंढरपुरात." कु. रेवती सोनारची ' इंडिया बुक ' मध्ये नोंद

Pandharpur LIVE 7 March 2019


पंढरपूर (प्रतिनिधी) :- येथील श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांची कन्या कु. रेवती रवि सोनार हिला तिच्या वाढदिवसाच्या औचित्याने तिचा भाऊ चि. ओंकार रवि सोनार याच्याकडून भेट म्हणून देण्यात आलेले डेस्क कॅलेंडर हे सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर असल्याचे 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' च्या वतीने कु. रेवती रवि सोनार हिला प्रमाणित करण्यात आलेले आहे.

          सात फूट उंच आणि दहा फूट रुंद या आकारात असलेले एकूण सत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे कॅलेंडर सात पानांचे असून पहिल्या पानावर वर्षभरातील बारा महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. तर उर्वरित सहा पानांवर प्रत्येकी दोन महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. शिवाय  त्या सहा पानांवर कवी रवि सोनार  यांचे  'बहिण' या विषयावरील  सुविचार  आहेत.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

एका लोखंडी फ्रेमवर हे भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर असून सर्व पाने महिन्या नुसार बदलणे शक्य आहेत. कु. रेवती सोनार हिच्याकडे असणाऱ्या या भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर मुळे जगातील सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर असे प्रमाणित करताना 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्' ने प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविले आहे.
          या डेस्क कॅलेंडरचे जगातील सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर म्हणून ' लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ' आणि  ' गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ' या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेकॉर्ड बुक मध्येही नोंद व्हावी म्हणून कु. रेवती सोनार प्रयत्नशील आहे. पंढरपूर येथील प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात प्राथमिक शिक्षण, द. ह. कवठेकर विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण तर उमा महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या कु. रेवती सोनार हिला वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेल्या या भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर मुळे तिला मिळालेल्या बहुमानामुळे पंढरपूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget