.
.
.

वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर

Pandharpur LIVE 15 March 2019


प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली. तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१  विभिन्न जातीच्या उमेदवारांना आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे. विशेष  म्हणजे, या पहिल्या यादीत स्वत: आंबेडकरांचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २,  तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
धनराज वंजारी ( वर्धा ), किरण रोडगे ( रामटेक ), एन के नान्हे ( भंडारा – गोंदिया ) , डॉ. रमेश गजबे ( गडचिरोली –चिमूर ) राजेंद्र महाडोळे (चंद्रपुर ), प्रवीण पवार (यवतमाळ – वाशीम), बळीराम सिरस्कार (बुलढाणा ), गुणवंत देवपारे (अमरावती ), मोहन राठोड ( हिंगोली ), प्रा. यशपाल भिंगे ( नांदेड ), आलमगीर खान ( परभणी), प्रा. विष्णू जाधव (बीड ), अर्जुन सलगर ( उस्मानाबाद ), राम गारकर ( लातूर ), अंजली बावीस्कर ( जळगाव ), नितीन कांडेलकर ( रावेर ), डॉ. शरदचंद्र वानखेडे ( जालना ), सुमन कोळी ( रायगड ), अनिल जाधव ( पुणे ), नवनाथ पडळकर ( बारामती ), विजय मोरे ( माढा ), जयसिंग शेंडगे ( सांगली ) मारूती जोशी ( रत्नागिरी – सिंधुदुर्ग ), डॉ. अरुणा गवळी ( कोल्हापूर ), अस्लम बादशाजी ( हातकंणगले ), दाजमल मोरे ( नंदुरबार ), बापू बर्डे ( दिंडोरी ), पवन पवार ( नाशिक ), सुरेश पडवी (पालघर ), डॉ. ए. डी. सावंत ( भिवंडी ), मल्लिकार्जुन पुजारी ( ठाणे ), डॉ. अनिल कुमार (मुंबई दक्षिण ), डॉं. संजय भोसले ( मुंबई दक्षिण मध्य ), संभाजी शिवाजी काशीद ( ईशान्य मुंबई ), राजाराम पाटील ( मावळ ), डॉ. अरूण साबळे ( शिर्डी )


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget