.
.
.

खळबळजनक.... पोलीस उपअधिक्षकाची महिला पीएसआयकडे लैंगिक सुखाची मागणी

Pandharpur LIVE 30 March 2019


“पाटण (जि.सातारा) विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांना एका विनयभंग प्रकरणातील गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासंदर्भात कागदपत्रांवर सही करण्यासाठी भेटण्यास गेले असता, त्यांनी शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच गुन्ह्यातील आरोपींसोबत तडजोड करुन पैसे न दिल्याने शिवीगाळ केली,’ असा खळबळजनक आरोप पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच “सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे याप्रकरणी दाद मागितली असता, त्यांनीही जातीवाचक शिवीगाळ करत केनने (पट्टी) फटके मारुन केबीनबाहेर काढले,’असा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर

Mail- livepandharpur@gmail.com 


यासंदर्भात शिंदे म्हणाल्या, “माझी नेमणूक पाटण पोलीस उपनिरीक्षक पदावर झाल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये अंगद जाधवर व पाटण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उत्तम भापकर यांनी संगनमत करुन अधिकाराचा दुरुपयोग करत माझा मानसिक, शारिरिक व आर्थिक छळ केला आहे. एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात हजर करण्यासाठी छाननी अहवालावर स्वाक्षरी घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग यांच्याकार्यालयात गेले होते. त्यावेळी जाधवर यांनी मला प्रश्‍न विचारला की, “सदर गुन्ह्यातील आरोपीकडून किती रुपयांची तडजोड झाली व त्यातील माझा हिस्सा मला आज देणे अपेक्षित आहे.’ त्यावर “मी कोणाकडूनही एक रुपया घेतला नसल्याने मी पैसे कोठून ठेवू,’ असे सांगितले. यावर जाधवर यांनी अतिशय अश्‍लिल भाषेत खरडपट्टी काढली. तसेच “तू बघ आता मी तुझी काय हालत करतो?’ अशी धमकीही दिली. याप्रकरणी “मी तत्कालिन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीकडे प्रकरण दिल्यानंतर समितीच्या चौकशीत अंगद जाधवर यांनी अपशब्द वापरल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांच्याविरोधात कोणती कारवाई न करता माझी बदली सातारा नियंत्रण कक्षात करण्यात आली.’

सातारा पोलीस अधीक्षक पदावर तेजस्विनी सातपुते रुजू झाल्याने, त्यांच्याकडे “पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विरोधात लेखी तक्रारीची दखल घ्यावी,’ अशी मागणी करण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी माझी तक्रार ऐकून न घेता उलट “तुच अश्‍लिल चाळे केले असणार, तुला घरी कसे बसवायचे, काय रिपोर्ट बनवायचा असे मला माहित आहे’ असे म्हणत, टेबलावरील केन उचलून सपासप तीन-चार फटके मारुन धक्के मारुन मला केबिनबाहेर काढले. सदर दोषी अधिकाऱ्यांवर ऍट्रोसिटी, विनयभंग व अधिकाराचा दुरुपयोग कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी माझी मागणी आहे.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget