मंगळवेढ्यात गुंडागर्दी... आमदार भालके यांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या संतोष माने यांना भालके समर्थकांकडून बेदम मारहाण... मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... आमदार भारत भालकेंच्या भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष!

Pandharpur LIVE 2 March 2019


Video Reportमंगळवेढा, जि.सोलापूर येथे आज एका सामाजिक कार्यकर्त्याला भरचौकात बेदम मारहाण करण्यात आली. भरदिवसा, भरचौकात या कार्यकर्त्याचे कपडे फाटेपर्यंत यास अमानुष मारहाण झाल्याने मंगळवेढ्यात गुंडागर्दी वाढलेली असल्याची भावना सर्वसामान्य मंगळवेढेकरांकडून व्यक्त होत आहे.  याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आजतागायत अमदार भालके यांच्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारे गुंडगिरी चेदर्शन घडलेले नाही. परंतु ऐन निवडणुकांच्या तोंडावरच ही घटना घडली आहे. या हल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असतानाच आमदार भारत भालकेंची याबाबतची भुमिका काय असेल याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे. 

याबाबत संतोष महादेव माने, रा. लेंढवे चिंचाळे, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर या तरुण सामाजिक कार्यकर्त्याने आमदार भारत भालके निष्क्रीय आमदार आहेत त्यांच्यामुळे मंगळवेढा तालुक्याचा विकास खोळंबलेला आहे. असा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलनं सुरु केले होते. दि. 28 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या वेळेस पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी खोटा राजीनामा देऊन जनतेची दिशाभुल केली होती व हा राजीनामा देताना मराठा, धनगर, महादेव कोळी व मुस्लिम जातीधर्माचा उल्लेख केला होता; परंतु तसा उल्लेख करुन आमदारकीचा राजीनामा कायद्यानुसार देता येत नाही, त्याबाबत आमदार भालके यांनी जनतेची माफी मागावी या कारणाकरीता दि. 28 फेब्रुवारी 2019 ते दि. 1 मार्च 2019 या कालावधीत संत दामाजी चौकामध्ये दामाजी मंदिराजवळ सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी धरणे आंदोलन केले होते.


दि. 2 मार्च 2019 रोजी सकाळी 12 वाजणेचे सुमारास संतोष माने, सतीश भगरे, सरताज गवंडी यांनी चोखामेळा चौक येथून चालत निषेध यात्रा सुरु केली होती. दरम्यान ही रॅली साडे बारा वाजण्याच्या सुमारास दामाजी चौक येथे आल्यानंतर मारुती वाकडे, डांगे यांनी ही रॅली आडवून आमदार भालके यांच्याविरुध्दच्या घोषणा बंद करण्यासंबंधी सांगितले. आमदार भालके यांना मी मतदान केले आहे व त्यांना जाब विचारण्याचा मला अधिकार आहे असे सांगत संतोष माने यांनी घोषणा थांबिविणेस नकार दिला. यानंतर त्याठिकाणी संदीप फडतरे, दिग्वीजय वाकडे, भिमराव मोरे, नाथा एवाळे, गोवे, महिला मोरे, अवघडे व इतर 4 ते 5 इसमांनी आमदारांची बदनामी करतो, काँग्रेस पक्षाची बदनामी करतो असे म्हणत संतोष माने यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरचे कपडे फाडले व पुन्हा आमदारांची बदनामी केलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद संतोष माने यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. 

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
माने यांच्या फिर्यादीनुसार संबंधीत आरोपींच्या विरुध्द भादंवि कलम 341, 323, 504, 506, 143, 147 व 149 अन्वये गुन्ह्याची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पीएसआय पुजारी हे करत आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पंढरपूर लाईव्हने आमदार भालके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

संतोष माने या तरुण सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून या व्हिडीओत ही अमानुष मारहाण कैद झाली आहे.
आमदार भारत भालके हे एक सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले आमदार, स्वाभिमानी आमदार व लोकशाही जपणारे आमदार अशी त्यांची ओळख सर्वश्रुत आहेच परंतु आ.भालके यांच्या कार्यकर्त्यांनी आज जी ठोकशाही मार्गाने अशा प्रकारे भरचौकात एका सामाजिक तरुण कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. याचं लाजीरवाणं दर्शन आज मंगळवेढेकरांसह संपुर्ण मतदारसंघातील जनतेला पहायला मिळालं आहे. सोशल मिडीयावरुन या घटनेचा निषेध होताना आढळून येत आहे.    

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget