.
.
.

ग्राहक पंचायतीच्यावतीने पंढरीत जागतिक ग्राहक दिन साजरा

Pandharpur LIVE 16 March 2019

बँकेच्या सेवेचे मूल्यांकन ग्राहकांकडून होते! - शिवाजी दरेकरपंढरपूर (प्रतिनिधी) जागतिक ग्राहक दिनानिमित्त येथील रुक्मिणी सहकारी बँक शाखा इसबावी आणि
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बँक ग्राहकांचा 'ग्राहक मेळावा' आयोजित
करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बँकेचे मुख्य व्यवस्थापक
शिवाजी दरेकर म्हणाले की, ग्राहक बाजारपेठेचा राजा असून व्यापारातील अर्थ व्यवस्थेची मुख्य भूमिका बँक जरी
निभावत असली तरी तिच्यामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचे मूल्यांकन ग्राहकच ठरवीत असतात, त्यामुळे
ग्राहकास 'पांडुरंग' समजून त्यास दर्जेदार सेवा पुरविणेची जबाबदारी बँकेची आहे. ती जबाबदारी आमची बँक
कर्तव्यदक्षपणे पार पाडत आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पुणे विभागाचे सचिव
प्रा. गुरुनाथ बहिरट, सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश फडे, पंढरपूर शहर व तालुकाध्यक्ष दिनेश खंडेलवाल

आणि बँकेचे ग्राहक मा. मुकुंद वाईकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


यावेळी मार्गदर्शन करताना शहर य तालुकाध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांनी सांगितले की या डिजिटल
युगात ऑनलाईन व्यवहार गरजचे झाले आहेत. ऑनलाईन खरेदी-विक्री करताना ग्राहकांनी सजग राहून व्यवहार
पार पाडावेत. यात काही फसवणूक झाल्यास आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना पंढरपूरचे सचिव मिलिंद वाईकर, उपस्थितांचे स्वागत जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे
यांनी केले, आभार प्रदर्शन जिल्हा सचिव विजय सामंत यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरपूरचे सहसंघटक सागर
रणदिवे यांनी केले. यावेळी नूतन सदस्य शार्दूल ताकभाते, प्रा. सौ. अर्चना कुलकर्णी, शिवकुमार भावलेकर यांचे
स्वागत शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांनी केले.
कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे दत्तात्रय नवले, पांडुरंग बापट, दत्तात्रय ताठे, महादेव खंडागळे,
शिवप्रसाद पिसे, ओंकार व्यवहारे, महेश देठे, महेश कुलकर्णी यांच्यासह बँकेचे परिसरातील असंख्य ग्राहक
उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी रवींद्र मोरे, बाबुराव जुमीवाले, नितीन सलगर यांचे
परिश्रम लाभले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget