.
.
.

सुशीलकुमार शिंदेना भाजपा, वंचित आघाडीचे आव्हान

Pandharpur LIVE 23 March 2019


सोलापूर मतदारासंघाकडे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून पाहिले जाते. २०१४ साली मोदी लाटेत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे नवखे उमेदवार शरद बनसोडे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. सोलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. मात्र २००४ साली भाजपच्या सुभाष देशमुख यांनी तर २०१४ साली शरद बनसोडे यांच्या रुपात भाजपने येथे आपला झेंडा रोवला. २०१९ ला हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी तयारी सुरु केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले तर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सोलापूरमधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे काँग्रेसकडे असून एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सोलापूर उत्तर आणि दक्षिण हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसची लोकसभा मतदारसंघावर तशी चांगली पकड आहे. २०१४ मोदी लाट ओसरलेली आहे. विद्यमान खासदारांच्या विरोधात जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा फायदा सुशीलकुमार शिंदे यांना होईल. मात्र दोन्ही पक्ष आपल्या प्रचाराची रणनिती कशाप्रकारे बनवतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याकारणाने वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर देखील इथून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात होते. तसे झाल्यास सोलापूर मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढण्याची शक्यता आहे.
शरद बनसोडे हे २००९ साली देखील सुशीलकुमार यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहिले होते. तेव्हा त्यांना २ लाख ८७ हजार मते मिळाली होती. मात्र २०१४ साली मोदी लाट असल्यामुळे त्यांना तब्बल ५ लाख मते मिळाली आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. २०१४ साली निवडणुकीसाठी इच्छूक नसतानाही बनसोडे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र ते उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. तरिही मतदारांची नाराजी लक्षात घेता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वादाचा फटका बनसोडे यांना बसण्याची शक्यता आहे.
सोलापूर लोकसभेसाठी अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. भाजपकडून अजून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पण जयसिद्धेश्वर महाराजांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती आहे.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget