अभाविप तर्फे स्वेरीत मिशन साहसी कार्यक्रम संपन्न

Pandharpur LIVE 11 March 2019पंढरपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य मैदानावर मुलींच्या स्वरक्षणासाठी अत्यंत आवश्यक  असणारा विशेष उपक्रम मिशन  साहसी नुकताच पार पडला.


         या कार्यक्रमामध्ये पंढरपूर मधील विविध शाळेतील मुलींनी सक्रिय सहभाग घेतला होता. मिशन साहसीचा मेगा डेमौनस्ट्रेशन  कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार मुलींना प्रशिक्षण घेता आले. या उपक्रमाला मुलींनीही प्रचंड प्रतिसाद दिला. 

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

यामध्ये स्वेरीअंतर्गत असणारे चारही महाविद्यालय अर्थात इंजिनिअरिंगबी. फार्मसीडिप्लोमा इंजिनिअरिंगडी. फार्मसी तसेच पंढरपूर शहरातील लोकमान्य विद्यालय,विवेकवर्धीनी विद्यालय, सखूबाई मातोश्री कन्या प्रशालाआश्रम शाळा वाखरी, यशकिर्ती विद्यालय ह्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी मिशन साहसी’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय जुदो खेळाडू भुवनेश्वरी जाधवसोलापूर जि.प.सदस्य ज्योती पाटील, वैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागणे-पाटीलसंस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगेश्रद्धा पावले आणि मैथिली महाकोडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष प्रशिक्षक म्हणून एशियन मार्शल आर्ट्सचे चिफ मास्टर सचिन भुईटेयोगेश भोसले,चिफ इंस्ट्रक्टरराजेश गायकवाडप्रशिक्षक परवेज शेखविकास घोडके यांनी विद्यार्थीनींना उपयोगी प्रशिक्षण दिले. अरुणा पुजारी हिने या कार्यक्रमाचे स्वरूप पटवून सांगितले.या कार्यक्रमासाठी स्वेरीचे सर्व अधिष्ठाता,विभागप्रमुखविद्यार्थी परिषदेचे सोलापूर  सहमंत्री शुभम अग्रवालसंगमनाथ उप्पिनजिल्हासंयोजक विशाल भोसलेशहर मंत्री तुकाराम कवठेकरपूजा रोंगेप्रणव बाडगंडीअनुप देवधरआनंद भुसनरमहाविद्यालयीन अध्यक्ष शुभम बंडगरगोपाळ सुरवसेसुरज पावसेअजय परदेशीआकाश लोहार,  प्रताप नेटकेनितीन टेळेकृष्णा शेंडगेमयुर वसवभूषण बचुटेसुशांत अलदरधनराज भोसलेसुयश लुबाल याचे बहुमोल सहकार्य लाभले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget