स्वेरीत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा ‘पालक मेळावा’ संपन्न

Pandharpur LIVE 11 March 2019

विद्यार्थ्यांच्या विकासात स्वेरीच्या प्राध्यापकांचे उल्लेखनीय योगदान -पालक प्रतिनिधी जिवाजी मिसाळपंढरपूर-आमच्या पाल्ल्यांचा बौद्धीक विकास हा येथील उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे होत असून विद्यार्थ्यांचा  भविष्यकाळ उत्तमपणे होण्यासाठी येथील प्राध्यापक वर्गाची शिक्षण देण्याची जी तळमळ दिसून येते ती खरोखरच उल्लेखनीय अशी आहे. विद्यार्थी गुणवंत बनून कृतीशील होण्याचा उपक्रम देखील विद्यार्थ्यांना बळ देणारा असा आहे. त्यामुळे स्वेरीची टीम अभिनंदनास पात्र आहे. म्हणून आम्ही टाकलेला विश्वास स्वेरीने सार्थ ठरविला.असे प्रतिपादन  पालक प्रतिनिधी जिवाजी मिसाळ यांनी केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटपंढपूर संचलित पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या पालक मेळाव्याचे  आयोजन केले होते. त्यात पालक प्रतिनिधी म्हणून जिवाजी मिसाळ  उपस्थितांना आलेल्या अनुभवातून मार्गदर्शन करत होते. प्रारंभी विभागप्रमुख डॉ. एस. ए. लेंडवे यांनी सर्व पालकांचे स्वागत करून पालक मेळावा’ आयोजिण्याचा हेतू सांगितला. पुढे डॉ. सतीश लेंडवे यांनी पालक मेळाव्याद्वारे प्राध्यापक व पालक’ यांचा सुसंवाद साधल्याच्या फायदा विद्यार्थ्यांना होतो’ हे सांगून स्वेरीचे शैक्षणिक धोरणअभ्यासक्रमनियमित घेतल्या जाणाऱ्या टेस्टअवघड वाटणाऱ्या विषयांसाठी जादा वर्गविद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली.


यावेळी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील परीक्षेमध्ये विद्यापीठात पहिल्या १० क्रमांकामध्ये  ११ विद्यार्थी व सी.जी. पी.ए. नुसार विद्यापिठाच्या परीक्षेत १० पैकी १० गुण मिळविलेले तब्बल ६१  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. ज्योती लोंढेएन. आर. यादवदिपाली साठेकुसुमडे,मिसाळठावरे  आदी पालकांनी आपले विचार मांडून काही समस्या व्यक्त केल्या. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व स्वेरी कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार  यांनी  पालकांच्या विचारांचे स्वागत करून मार्गदर्शन केले व उर्वरित समशयन समस्यांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. अधिष्ठाता डॉ. पवार म्हणाले की, ‘ज्ञानकौशल्य आणि योग्य दृष्टीकोन’ हे महत्वाचे तीन गुण जर विद्यार्थ्यांमध्ये असले तर तो करिअर करताना कुठेही कमी पडणार नाही.’ असे सांगून डॉ. पवार यांनी महाविद्यालयीन जीवनात मिळवलेले यश कसे टिकवायचे याकडे लक्ष देण्यास सांगितले. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉअभय उत्पात, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.पी.एस.कचरेट्रेनिग अँण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. एम.के. राऊळइलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख डॉ.अनुप विभूतेप्राध्यापकवर्ग व  जवळपास ५०० पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन गितेश्वरी शिंदे यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. पवार यांनी मानले.  
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget