भिमज्योत सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रिडा मंडळाच्या लढ्याला यश!

Pandharpur LIVE 6 March 2019

आमरण उपोषणादरम्यान नगरपरिषद प्रशासनाकडून लेखी आश्‍वासन
पंढरपूर (प्रतिनिधी):- 197, ब, रामबाग, जुनी पेठ, पंढरपूर येथील बौध्दनगरमध्ये समाजमंदिराच्या उभारणीसाठी भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाचा गेल्या बर्‍याच दिवसांपासूनचा लढा यशस्वी झाला असून आज समाजमंदिराच्या मागणीसाठी पंढरपूर नगरपरिषदेमध्ये  आमरण उपोषण सुरु  असताना पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडून आमची मागणी मान्य झाल्याचे व लवकरच समाजमंदिर उभारणीसाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे लेखी आश्‍वासन दिले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर दंदाडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

आज दि. 5 मार्च 2019 रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मंडळाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमरण उपोषणास बसले होते. समाजमंदिराची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही. असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. दरम्यान उपोषणस्थळी आंबेडकरी चळवळीचे अनेक नेते, विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट दिली. या आंदोलनाला पाठींबा देत सर्वांनीच समाजमंदिर उभारणे आवश्यक असल्याचे नगरपरिषद प्रशासनाला दर्शवून दिले. यानंतर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी सदर समाजमंदिर उभारणीस मान्यता देऊ व यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरु करु. असे लेखी आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर उपोषण मागे घेतले. या आंदोलनात शरद दंदाडे, नंदकुमार लोखंडे, आनंद वाघमारे, संतोष धनवजीर, नागेश कांबळे, शंकर खरे, लखन ढवळे, विकी दंदाडे, प्रकाश दंदाडे, प्रकाश वाघमारे हे सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी समाजाचे नेते बाळासाहेब कसबे, अप्पासाहेब जाधव, जितेंद्र बनसोडे, नगरसेवक राजु सर्वगोड, नगरसेवक महादेव भालेराव, नगरसेवक डी.राज सर्वगोड, संतोष सर्वगोड, अंबादास वायदंडे, नानासाहेब वाघमारे आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित राहिले होते. आंदोलनादरनम्यान समाजमंदिर उभारणीसाठीची कार्यवाही लवकरात लवकर करु असे लेखी आश्‍वासन उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी दिले. यावेळी मा.नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, इब्राहीम बोहरी, मुन्नागीर गोसावी, सचिन डांगे, नगरसेवक सुधीर धोत्रे, नगरसेवक सुरेश नेहतराव, नगरसेवक विक्रम शिरसट, अमोल डोके, नगरसेवक गुरुनाथ अभ्यंकर, गुरु दोडीया, किशोर खिलारे, संदीप माने, संदीप मुटकुळे, सुमीत शिंदे, आदींसह पंढरीतील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.   
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget