.
.
.

प्रमोद सावंत बनले गोव्याचे नवे मुख्यमंत्री

Pandharpur LIVE 19 March 2019


पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे. सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री पावणे दोन वाजता सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. नव्या मंत्रीमंडळीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर व गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शिवाय मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि अखेर अपेक्षेप्रमाणे विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सायंकाळी या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली व अंतिम निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. आमच्याकडे १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला. परंतु गोव्यात भाजपचे सरकार येईल असा दावा अमित शहा यांनी रात्री बैठकीनंतर केला.

राज्यात सत्ताधारी भाजपच्या १२, महाराष्ट्र गोमांतक पक्षाच्या ३, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या ३ आणि अपक्ष ३ अशा एकूण २१ जागा आहेत. मात्र पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट असलेल्या सहयोगी पक्षांमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरुन मतभेद आहेत. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यासाठी घेतलेल्या बैठकीत एकमत होत नसल्याने चर्चेच्या फे-या दुपारपासूनच सुरू होत्या. या राजकीय सत्तासंघर्षात काँग्रेसही सक्रिय झाल्याने भाजप नेते सतर्क झाले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गोव्यातील भाजपाचे आमदारांची बैठक झाली. त्यावेळी प्रमोद सावंत यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. शाह यांनी मात्र याबाबत गडकरी लवकरच याबाबत घोषणा करतील असे सांगून ते बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीस प्रमोद सावंतही हजर होते. 
प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च २०१७ पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब:याच चर्चेनंतर तयार झाले. 
गोवा फॉरवर्ड व मगोपने जास्त ताणून धरले व भाजपशी संघर्ष केला तर गोवा विधानसभा निलंबित केली जाण्याची शक्यता होती. विरोधी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी, त्या पक्षाला सरकार स्थापन करू देण्यास भाजप कधीच तयार होणार नाही याची कल्पना मगोप व गोवा फॉरवर्डलाही आहे.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget