.
.
.

राजकीय नेते 'प्राॅडक्ट बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल' समजून तरुणाईचा वापर करतात का? आजची तरुणाई आणि राजकारण... निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष लेख

Pandharpur LIVE 17 March 2019


लेखन- रघुनाथ पवार, खेडभाळवणी, ता. पंढरपूर
         
खरं तर अनेक राजकीय पक्ष अनेक तरुणांकडे हे 'कच्चामाल' या दृष्टीकोनातून बघत असून त्यांच्या  'प्रॉडक्ट' बनवण्यासाठी जो कच्चामाल लागतो  त्या मालाला दर मात्र कमी असतो. जसे शेतकऱ्यांकडे प्रत्येक  प्रॉडक्टचा कच्चा माल आहे पण त्याला कवडीमोल किंमत (दर) आहे.  तशीच परिस्थिती या राजकीय पुढाऱ्यांनी तरुणांची  करून ठेवली आहे. यामध्ये तरूण राजकारणात आणि आपल्या पक्षात हवा, पण तो प्रचारासाठी  व आंदोलनासाठी..!! तरुणांचा एक तर सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातीसाठी वापर करतात नाहीतर राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तरूणांकडून विविध मोर्चे आंदोलनं करवून घेतात. म्हणून सुजाण तरुणांनी त्यांच्याकडे या अपेक्षेने पाहणार्‍या पुढाऱ्यांना वेळीच ओळखण्याची गरज आहे.  व पुढा-यांनीही ह्या गोष्टीचे राजकारण करण्यापेक्षा  त्या तरुणांना  उद्योगाकडे वळवावे म्हणजे येणा-या काळात भारत देश हा   नक्कीच  जागतिक  महासत्ता होईल . 

तरुण म्हटलं की आठवत एक धगधगत, सळसळत रक्त ज्यांच्यामध्ये लाथ मारेन तिथ पाणी  काढण्याची धमक असते ,ज्यांच्या जिभेतुन निघणार्या  प्रत्येक  शब्दाला धारदार  शब्दाची पात असते आणि ज्याच्याकडुन  काहीतरी  नविन  करण्याची  उमेेद असते त्याचबरोबर  देश ज्याच्या खांद्यावर विकासाची स्वप्ने पाहतो तो तरुण .
   आजची तरुणाई   आणि राजकारण या विषयावर  मला थोडंसं लिहावे वाटते, कारण जी देशाची खरी संपत्ती  असती ती  एक म्हणजे  एक तरुण वर्ग. तोच तरुण वर्ग हा उद्याचा सुजाण नागरीक  असतो. ज्याच्याकडुन स्वतःच्या आईवडिलांबरोबर  देशालाही त्याच्याकडून काही प्रमाणात अपेक्षा असतात. आज भारत देशाची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे तरुणांचा देश. या देशामध्ये  तरुणांची संख्या ही एकुण लोकसंख्येच्या सुमारे 65% आहे तो भारत देश हा एक तरुण  देश  आहे  याच भारत  देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे  की या देशातून  काही काही पोटॅशिअल (potential  , energy ) निघेल व तेथुन काही नाविन्य पुर्ण  गोष्टी,  शोध लागतील व येथुनच जगाला एक वेगळी  आदर्शवादी  दिशा मिळेल अशी आशा आहे.  
     

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

अजून एक दुसरा मुद्दा आहे तो, राजकारण आणि तरूणाई एवढे दोन मोठे विषय आहेत की छोट्याश्या  लेखामध्ये सांगणे शक्य नाही  राजकारण आणि तरुणाई हे  विषय असे आहेत की ते प्रत्येक विषयाला स्पर्श करतात .
खरच राजकारणामध्ये तरुणांचा  सहभाग असणे हा लोकशाही देशातील एक भाग्य की या देशांमध्ये वयाच्या अठराव्या वर्षी तरुणांना  मतदानाचा अधिकार दिला आहे. यामुळेच तरुणाई  प्रत्यक्ष राजकारणात आपला  मतदानाद्वारे व इतर अंगाने सहभाग नोंदवू शकतो यांच्यामध्ये राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये तरुणांच्या देशांमध्ये काय हवाय काय नाही, कोणता विकास कामे या देशांमध्ये हवेत,कोणत्या विचाराचे सरकार या देशांमध्ये  पाहिजेत हे ठरवण्याचा व कायापालट करण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये  आहे. ही आपण मागील काही निवडणुकांमध्ये निर्णायक  भूमिका बजावलेली आपण पाहिली आहे; पण खरेतर ह्या सर्व गोष्टी आपण निवडणुकीच्या व मतदानाच्या दृष्टीने पाहिल्या आणि दुसरे म्हटले तर तरुणांचा राजकारणात प्रत्यक्ष सहभाग यामध्ये आपण पाहतोय की, प्राचीन  काळापासून राजसत्तेला व राजकारणाला  एक अनन्य साधारण महत्त्व आहे व याच महत्त्वाच्या हव्यासापोटी  राजकारणाची गोडी ही आज वृद्धांपासुन तरुणाई पर्यत आहे.  आपण पाहतो की देशांमध्ये देशातील प्रमुख व छोटे-मोठे  पक्ष हे आपल्या पक्षाची तरुणांमध्ये एक चांगली प्रतिमा आहे.
 तरूणांसाठी  काम करणारे पक्ष आहेत.  यासाठी युवकांच्या स्पेशल शाखा व संघटना तयार करून  युवकांना आपल्या पक्षाच्या  विचारसरणीत  आणण्यासाठी प्रत्यक्ष -  अप्रत्यक्ष प्रयत्न करताना दिसतात. यामध्ये पक्षातील मोठ्या  मोठ्या  पुढाऱ्यांची मुले यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदावर काम करताना पाहिले जातात. पण खरोखरच देशातील राजकारणाला एक विकासात्मक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना खरोखरच संधी मिळते का? व ती संधी त्याचे काम, कार्य  पाहून दिले जाते का ? यावर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी  सकारात्मक  विचार करण्याची  गरज आहे. कारण आपण आपल्या परिसरातील राजकीय लोकांनी जी परिस्थिती करून ठेवले ते आपण बघतोय काय आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे ति मी सांगण्याची गरज नाही.

        आजचा तरुण प्रत्यक्ष राजकारणात कसा ओढला जात आहे हे जर पाहिले तर  तो  आजचा तरुण उच्चशिक्षित आहे पण सोशल मिडियाच्याही अगदी जवळ तरुण पिढीच आहे. खरं तर आज आपल्या देशातील तरुणांच्या बेरोजगारीची टक्केवारी पाहिली तर ती धक्कादायक आहे. त्यामध्ये  तो उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या  डिग्री  असुन  त्यांच्याकडे काम  (रोजगार)नाही.  याची तरूणांनी   , शैक्षणिक संस्था,  राजकीय पुढाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे.


               खरंच  आजच्या उच्चशिक्षित तरुणाकडे   मोठ - मोठ्या डिग्री  घेऊन त्यांच्याकडे काम नसल्यामुळे तो सोशल मिडियाच्या जवळच राहुन  एक सोशल मिडियावर आपला मोलाचा वेळ वाया घालवतात .सोशल मीडियावर राजकीय पक्षांच्या सोशल मिडिया सांभाळणाऱ्या पोरांनी  टाकलेल्या भावनिक व इतर पोस्ट करून तरुणांच्या राजकीय भावना  जाग्या  होतात. त्यातूनच ते राजकीय  पक्षाकडे वळला  जातात व ते राजकारणाच्या  चुकीच्या प्रथांना बळी पडतात.  आपल्या आयुष्यातील लाख मोलाचा वेळ वाया घालवत आहे राजकीय पक्ष हे तरुणांना राजकारणात संधी देत आहेत की फक्त राजकारणासाठी प्रचार आणि आंदोलनासाठी वापर करतात. याचा परिणाम तुम्ही  येणा-या निवडणुकीतील तिकीट वाटप्याच्या निर्णय यावरून  पाहु शकता .  

खरं तर अनेक राजकीय पक्ष अनेक तरुणांकडे हे 'कच्चामाल' या दृष्टीकोनातून बघत असून त्यांच्या  'प्रॉडक्ट' बनवण्यासाठी जो कच्चामाल लागतो  त्या मालाला दर मात्र कमी असतो. जसे शेतकऱ्यांकडे प्रत्येक  प्रॉडक्टचा कच्चा माल आहे पण त्याला कवडीमोल किंमत (दर) आहे.  तशीच परिस्थिती या राजकीय पुढाऱ्यांनी तरुणांची  करून ठेवली आहे. यामध्ये तरूण राजकारणात आणि आपल्या पक्षात हवा, पण तो प्रचारासाठी  व आंदोलनासाठी..!! तरुणांचा एक तर सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातीसाठी वापर करतात नाहीतर राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तरूणांकडून विविध मोर्चे आंदोलनं करवून घेतात. म्हणून सुजाण तरुणांनी त्यांच्याकडे या अपेक्षेने पाहणार्‍या पुढाऱ्यांना वेळीच ओळखण्याची गरज आहे.  व पुढा-यांनीही ह्या गोष्टीचे राजकारण करण्यापेक्षा  त्या तरुणांना  उद्योगाकडे वळवावे म्हणजे येणा-या काळात भारत देश हा   नक्कीच  जागतिक  महासत्ता होईल .  एकूणच मतदान टक्केवारी  का कमी होते यावर विचार करण्याची गरज आहे  कारण आज शहरी भागात मतदानाची टक्केवारी आणि ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की, जी   टक्केवारी कमी होते का तरुणांची मतदान करण्यासाठी कल  कमी आहे  हा संशोधनाचा विषय आहे .पण खरे तर राजकीय पुढारीही घोषणाबाजी करताना पुढे असतात ते भाषणात म्हणतात की  आम्ही  तरुणांसाठी हे केले ते केले जणूकाही त्यांच्या  बापाची  इस्टेट विकून तर तरूणांवर  उपकार केल्यासारखे बोलताना  दिसतात म्हणून एवढे काम कर केले तेवढे काम केले .खरं तर शासनाच्या व सरकारचा जेवढा विकासाच स्पीड कदाचित  वन जी  अॅण्ड  टू जी असावं  पण तरूणांनां हवे आहे तेच टेन जी  स्पीड हवे  आहे हे स्पीड देण्यात शासनाबरोबर राजकीय  पुढारी ,पक्षही कमी पडतात. कारण काही राजकीय पुढाऱ्यांनाही त्यांच्या राजकारणाचं पडलेलं असतं आणि   काही शासनाच्या नोकरदाराना त्याच्या पगारीचं पडलेलं असते . राजकीय पुढारी भाषण करताना सांगतात की आम्ही एवढं काम केलं प्रत्यक्षात आजची तरुणाई  हुशार आहेत  त्याच्याकडे  प्रत्येक  विषयाच्या तळ्याशी  (ग्राऊंड लेव्हलवर )जाऊन पाहण्याची त्यांची क्षमता आहे तर त्या ठिकाणी त्याच पुढाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी पैकी एकही  गोष्ट त्यांना कदाचित  प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून राजकारणातील पुढार्यानी केलेल्या घोषणा  ह्या हवेत राहिलेले  अनेकांनी अनेक वेळेस  पाहिले आहे नाहीतर बापाच्या काळातील घोषणा पोरांच्या काळातही पुर्ण  होताना दिसत नाही त्या  कामाची किंमती-दर  तोपर्यंत  पाच -पन्नास  पटीने  वाढताहेत हे अनेक राजकीय  पुढार्याही मान्य  करतील . त्यामुळे  कदाचित या तरुणांना मतदान करतात कौल  तशा जाणवत असावा . म्हणूनच या तरुणाच्या विचार ओळखण्याची क्षमता या सरकारने व राजकीय पक्षांनी  व पुढ्यार्यानी ठेवली पाहिजे नाही तर एकूणच राजकारणात तरूणांचा सहभाग हा फक्त भाषणात देण्यापुरताच  मुद्या  होईल का ......?
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget