पंढरीत ‘पालवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Pandharpur LIVE 5 March 2019


पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘पालवी’ हा लघुपट माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड कॉलेजच्या सभागृहात रविवारी (ता.3) सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास करांडे, पालवीच्या मंगलताई शहा, डिंपल घाडगे, अभिनेता संकेत शिंदे, रेडिओ जॉकी आर.जे.किंग ऋषिराज, म्हाडाचे उपमुख्य अभियंते सुनील ननवरे, अ‍ॅड.घोगरदरे, इर्शाद मुजावर, पत्रकार राजकुमार घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.परिचारक म्हणाले, पालवी संस्थेचे सामाजिक कार्य अनमोल आहे. मी अगदी सुरवातीपासून पालवीच्या कार्याचा साक्षीदार आहे. पालवीमुळे आजच्या तरुणाईला चांगली दिशा मिळाली आहे. आजची तरुणाई संवेदनशील आहे .त्यामुळेच युवा दिग्दर्शक रविदत्त घोगरदरे, गितेश्‍वरी शिंदे व त्यांच्या तरुण सहका-यांनी पालवी संस्थेच्या कार्यावर एक उत्कृष्ट व काळजाला भिडणारा लघुपट तयार केला आहे. सुमारे 15 मिनीटांचा लघुपट पाहिल्यानंतर उपस्थित सर्व प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com हा अप्रतिम लघुपट बनविल्याबद्दल दिग्दर्शक रविदत्त घोगरदरे, मंदार परिचारक, गितेश्‍वरी शिंदे व त्यांचे सहकारी विक्रम शिंदे, प्रतीक बेसुळके, ऋषिकेश घोगरदरे, प्रणव डोंगरे, निखिल मेश्राम, विनायक गडदे यांच्यासह लघुपटात अभिनय केलेले कलाकार ज्योत्स्ना नागणे व बाल कलाकार पियुष भंडारकवठेकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी अभिनेता संकेत शिंदे, रेडिओ जॉकी आर.जे.किंग ऋषिराज,  दिग्दर्शक रविदत्त घोगरदरे यांनी आपली मगोगते व्ये केली. हा लघुपट लवकरच सोशल मिडीयावर अपलोड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती आराध्ये यांनी केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget