.
.
.

गटा- तटात अडकला माढ्याचा तिढा... उत्सुकता मात्र जनतेला... कोण उचलणार हा विडा?

Pandharpur LIVE 17 March 2019


सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून देशात सर्वत्र राजकीय वातारण तापू लागले आहे, अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरुन सध्या मतदार संघासह राज्यात चर्चेला उधाण आले असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणास बहाल करुन माढ्याचा तिढा कसा सोडवणार याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. एकुणच माढ्याच्या जागेचा विडा कोण उचलणार याची उत्सुकता जनतेला लागुन राहिली आहे.


सोलापूर जिल्ह्यामधील 4 आणि सातारा जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभामतदारसंघ समाविष्ट असलेल्या माढा लोकसभा मतदार संघाची 2008 साली निर्माती झाली. माढा लोकसभा मतदार संघाच्या निर्मी तीपासून ते आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीवेळी उमेदवारीच्या मुद्दावरुन या मतदार संघात बरीच खलबत झाली आहेत, त्यामुळे उमे दवारी बाबतीत माढ्याचा तिढा ही म्हणून प्रचिलित झाली आहे. 2009 ला माढा या नवीन मतदार संघाची पहिली निवडणुक होत असताना या मतदार संघाचा प्रबळ उमेदवार म्हणुन मोहिते-पाटील यांच्या नावाचीच चर्चा झाली होती.राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रीपद भुषवलेले व राष्ट्रवादी ताकदवान नेते म्हणून परीचित असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांचा हक्काचा माळशिरस विधानसभा मतदार संघ राखीव झाल्याने विजयसिंह मोहिते-पाटीलच माढा लोकसभेच्या उमेदवारीचे हक्कदार मानले जात होते. अशातच सन 2009 ला मोहिते-पाटीलांनी उमेदवारीसाठी रणजितसिंह मोहिते-पाटीलचे नाव पुढे आणल्याने थोड्याफार विरोधाला सुरुवात झाली,बाहेरुन होणारा थोड्याफार विरोधाचे रुपात्तंर पुढे प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या रुपाने घरातुनच तिव्र विरोध निर्माण झाला एवढंच नाही तर प्रतापसिंहांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करुन प्रचाराला सुरवातही केली.अशा कठीण परीस्थितीत त्यावेळी खुद्द विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवारांनी माढ्यात निवडणुक लढवण्याचे अमंत्रण दिलं.पवारांनीही माढ्याची उमेदवारी स्विकारत मतदार संघ अभेद ठेवण्यासाठी सरसावले.पवार साहेबांच्या उमेदवारीचे स्वागत करत प्रतापसिंहांनी उमेदवारी घेत त्याचे स्वगत करुन प्रचारात सक्रीय झाले.संपुर्ण मतदार संघातील मोठ्या नेत्यापासून ते सर्व कार्यकर्ते व मतदारांना नव्या विकासाची स्वप्न पडू लागली पवार साहेब आत्ता माढ्याची बारामती करतील अशी अपेक्षा बाळगुन भरघोस मतानी सहेबांना निवडून दिले.साहेब संसदेत गेले कृर्षीमंत्री झाले परंतु माढ्याच्या बारामती होण्याचे स्वप्न हे स्वप्नचं राहीले.बघता बघता पाच वर्षाचा काळ संपत येवु लागला संपुर्ण देशात सरकारच्या विरोधात संतापा बरोबर मोदी लाटेचा प्रभाव वाढत असताना पवार साहेंबांनी राजेसभेची सुरक्षित जागा गाठत यापुढे मी कोणतीही निवडणुक लढवणार नसल्याची भिष्म प्रतिज्ञा केली.


2014 च्या निवडणुकांचे बिगुल वाजताच माढ्याच्या उमेदवारीची चर्चा पुन्हा रंगु लागली,मोदी लाटेत माढ्याचा गड कोण राखणार असा प्रश्‍न असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गळ्यात पवार साहेबांनी उमेदवारीची मिळ टाकली.पुर्वी मंत्रीपदाच्या कार्यकाळात मतदार संघात असलेल्या दांडग्या जनसंपर्क व लोकप्रियतेमुळे खडतर काळात व मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवला.गत पाच वर्षात देशात व राज्यात सत्ता नसतानाही प्रगल्भ राजकीय अभ्यास व सर्व पक्षातील सलोख्याच्या संबधामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मतदार संघात कामाला गती दिली.सन 2014 च्या खडतर परीस्थितीत निवडणुक जिंकून मतदार संघातील केलेल्या कामाच्या प्रभावाने सन 2019 ला विजयसिंह यांच्या शिवाय दुसरा उमेदवार असूच शकत नाही अशी परीस्थिती निर्माण झाली होती.असे असताना निवडणुकांच्या तोंडावरच राष्ट्रवादीचा झेंडा खंद्यावर घेत मतदार संघात गाव भेटी व दौर्‍याने उमेदवारीची इच्छा व्यक्त करणारे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख चिंगलेच चर्चेत आले होते.तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील यांनीही आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


हे सर्व घडत आसताना संयमी वृत्तीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे मात्र शांत होते,वयाची पंच्याहत्तरी पार केलेले विजयदादा निवडणुक लढणार की रणजितसिंहांना उमेदवारी मागणार आशी चर्चा जोर धरत होती.अशातच पवार साहेबांनी माढ्याच्या बाबतीत मीच निवढणुक लढणार आसून त्याला विजयसिंह मोहिते-पाटीलांच्या निमंत्रणाचे ठोस कारण पुढे केले,विजयसिंहांनीही यास दुजोरा दिल्याने माढ्याच्या उमेदवारीचा प्रश्‍न संपला असे वाटत असतानाचा पवार साहेबांनी कौटुंबिक कारण देत "यु टर्न" घेत आपली उमेदवारी माघारी घेतल्याने माढ्याचा उमेदवार कोण अशी चर्चा पुन्हा रंगत आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवारांनी मात्र कोणताही निर्णय ठोस पणे जाहीर न करता उमेदवारीचे घोंगडे भिजत ठेवले आहे.सोलापुर जिल्ह्यातील माढा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला 2009 ला शरद पवारांच्या उमेदवारी नंतर या परीसरात राष्ट्रवादीचे अधिक बळकटीकरण होईल अशी अपेक्षा होती.मात्र पवार साहेंबांच्या एंन्ट्रीनंतर माढ्याचा तिढा व पक्षातील गटबाजीत कमालीची वाढ झाली आहे.पुर्वी पंढरपूर लोकसभा मतदार संघात मोहिते-पाटीलांनी दगड उभा केला तरी तो निवडून येणारच अशी ख्याती होती,तर त्यावेळी मोहिते-पाटीलांनी दिलेला उमेदवारच पंढरपुर मधुन विजय होत होत.परंतु दिवस बदलले तसे राजकीय वारेही बदलले मोहिते-पाटीलांची एकहाती वर्चस्व संपत असताना पक्षातर्गत गटबाजी फोफावत आहे.यातुन मोठ्या साहेंबाचे खतपाणी यामुळे भविष्यात राजकारणातील दिशा काय आसेल,मोहिते-पाटील पवारांच्या कुरघोड्यांना पक्ष बदलुन उत्तर देणार का ? रणजितसिंह भाजपमध्ये ही बातमी कधी काळी एकायला मिळणार का ? याबरोबच माढ्याचा 2019 चा उमेदवार कोण असेल व गटातटाच्या या परीस्थितीत राष्ट्रवादीचा किल्ला अभेद राहणार का या बाबतची उत्सुकता लागुन राहीली आहे.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget