.
.
.

आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार? मुंबईत भाजपाविरूध्द पोस्टरबाजी

 ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले. त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले’. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार? असा सवाल करत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपविरोधात मुंबईभर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दादर येथील शिवसेना भवनासमोर लावलेले पोस्टरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बुरा न मानो होली है!’ असे म्हणत भाजपची फिरकी घेतली आहे.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नगरच्या जागेसाठी हट्ट धरला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ही जागा आपल्याला मिळावी यासाठी सुजय विखे जंगजंग पछाडत होते. मात्र, आघाडीने ही जागा सुजयला सोडण्यास साफ नकार दिला. अखेर आघाडी आपल्याला तिकीट देत नसल्याचे लक्षात येताच सुजय विखेंनी १२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
सुजयपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते व माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. २० मार्च) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने रणजितसिंह मोहिते यांना तिकीट देण्यास नकार दिला होता. विजयदादांनीच निवडणूक लढवावी असे शरद पवारांनी असे सांगितले होते. मात्र, विजयदादांनी मला नको तर माझ्या मुलाला रणजितसिंहला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. मात्र, माढ्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा रणजितसिंह यांच्या उमेदवारीला मोठा विरोध आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास दगाफटका होईल असे सांगत उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुजय विखेंच्याच मार्गाने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.

सुजय विखेंना व रणजितसिंह मोहितेंना काँग्रेस आघाडीने पर्यायाने राष्ट्रवादीने नाकारलेच आहे. मात्र, भाजप याचा मोठा गाजावाजा करताना दिसत आहे. त्यामुळे होळीच्या निमित्ताने मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी भाजपविरोधात पोस्टरबाजी केली आहे. यात ‘आम्ही ज्यांना नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. दुस-यांची पोरंच मांडीवर घेऊन गोंजरत बसणार आहात की तुमचाही पाळणा कधी हालणार आहे असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला विचारला आहे.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget