शिवयोगी मंगल भवन येथील श्री ओंकारेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त केळी व फराळाचे वाटप

Pandharpur LIVE 5 March 2019


पंढरपूर येथील शिवयोगी मंगल भवन येथील श्री शंभु महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना केळी वाटप करण्यात आले. पंढरीतील लिंक रोडवर असलेल्या शिवयोगी मंगल भवन येथील श्री ओंकारेश्‍वर महादेव हे अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवभक्त येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते.  महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे व सौ.अंजली वानखेडे या दांपत्यांच्या शुभहस्ते श्री ओंकारेश्‍वर महादेवाची पुजा संपन्न झाली.  

आलेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व आवश्यक त्या सुविधा शिवयोगी मंगल भवनचे संचालक ओंकार बसवंती व सौ.आरतीताई बसवंती यांनी उपलब्ध केल्या होत्या. आलेल्या भाविकांना केळी व साबुदाणा खिचडीचे वाटपही करण्यात आले.  भाविकांना महाप्रसाद व खिचडी वाटप करताना अभिजीत देशपांडे, योगेश झेंडे, संतोष मलपे, सचिन वरपे, संतोष माने, रवी निंबाळकर, वाघ सर, अलाट सर, चि.राजवीर ओंकार बसवंती, कु.राजलक्ष्मी ओंकार बसवंती, कु.वैदेही हुच्चे अनेक भाविक उपस्थित होते.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget