पंढरपूर बंदला महादेव कोळी समाज संघाचा विरोध

Pandharpur LIVE 6 March 2019


पंढरपूर शहर वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात काही संघटनांनी 8 मार्च रोजी महिला दिनारोजी पंढरपूर बंद पुकारला आहे.पंढरपूर शहरात सद्या वाहतूक शाखेकडून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.वाहतूक शाखेकडून करण्यात येत असलेल्या सर्वच कारवाया योग्य आहेत असेही समर्थन आम्ही करीत नाही मात्र शहरातील  कायदा व सुव्यवस्था व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक शाखेकडून काही कारवाया करणे गरजेेचे आहे.मात्र शहर वाहतूक शाखे विरोधात थेट पंढरपूर बंद ठेवण्यास आमचा विरोध असून हा बंद पुकारून सर्वसामान्य जनतेला,व्यापार्‍यांना वेठीस धरु नये.त्या ऐवजी उग्र आंदोलनाचे इतरही अनेक मार्ग आहेत व या आंदोलनात आमचा सहभाग असेल.अशी आमची भुमिका आहे अशी माहीती समस्त महादेव कोळी समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप माने यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

      पंढरपूर शहर वाहतूक शाखेकडून सद्या शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे.ट्रिपल सीट,अल्पवयीन   मुलांकडून सुसाट वेगाने वाहन चालविणे,लायसेन्स नसणे,वाहनांवर विमा नसणे या बाबत करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाई बाबत सद्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असली तरी याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे दाद मागण्याचा पर्याय आहे अथवा इतरही मार्गाने आंदोलने करता येवू शकतात.मात्र त्यासाठी पंढरपूर बंद ठेवण्याची आवश्यकता नाही अशी आमची ठाम भुमिका आहे.या बंद मुळे पंढरपूरचे जनजीवन विस्कळीत होणार आहे.येथे येणार्‍या भाविकांना या बंदचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.विविध समाजिक संघटना व पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत यापुर्वी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत यापुढे पंढरपूर बंद पुकारण्यात येणार नाही अशी रास्त भुमिका सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी बोलताना व्यक्त केली होती. मात्र आता पुन्हा पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget