.
.
.

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर.. मावळमधून पार्थ पवार, नाशिकमधून समीर भुजबळ, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे तर बीडमधून बजरंग सोनवणे मैदानात

Pandharpur LIVE 16 March 2019


राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आधीपासून चर्चा सुरू असल्याप्रमाणे पार्थ पवार यांना मावळमधून तिकीट देण्यात आले आहे. त्याबरोबरच समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

आज जाहीर झालेल्या यादीमध्ये मावळ आणि नाशिकसह दिंडोरी, शिरुर आणि बीड मतदारसंघांसाठी उमेदवारही घोषित करण्यात आले. नगर आणि माढ्यासाठीच्या उमेदवारांची नावं मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवली आहेत. यामागे नेमके कोणते कारण आहे? याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

पुढची यादी दोन दिवसात होणार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले. पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे त्यांनी सांगितले.दिंडोरीमधून धनराज हरिभाऊ महाले, शिरुरमधून शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले डॉ. अमोल कोल्हे आणि बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

बीडमध्ये काय होणार?

बीड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे प्रमुख आव्हान असेल. 2009 आणि 2014 साली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा विजय झाला होता. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांचा विजय झाला होता. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांना 6 लाख 35 हजार 995 मते मिळाली होती तर पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 16 हजार 923 मते मिळाली होती.

बजरंग सोनवणे कोण आहेत?राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. सोनवणे आणि त्यांची पत्नी जिल्हापरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात त्यांचे सर्वत्र नाव आहे.  


Image  SONAWANE/FACEBOOK

सोनवणे यांना पक्षांतर्गत विरोधक नाहीत. लोकसभेसाठी ते नवखे असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते नवखे नाहीत. येडेश्वरी हा साखर कारखाना ते चालवतात. या कारखान्यामुळे केज आणि परळी दोन तालुक्यांवर त्यांचा प्रभाव आहे. प्रस्थापित नेत्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष असत. सोनवणे यांचा चेहरा त्या अर्थाने प्रस्थापित नाही. ही निवडणूक अटीतटीची होईल असं वाटतं."

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

पार्थ पवारांच्या उमेदवारीमुळे पवार कुटुंबात संघर्ष

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाल्यावर शरद पवार यांना रोहित राजेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.
"साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदराच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा," असं रोहित यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवार कुटुंबीयांतल्या राजकीय सत्तासंघर्षाला सुरुवात झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


रोहित आणि पार्थ यांच्यात स्पर्धा?

स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, "पवारांच्या कुटुंबातील तरुण पिढीत राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत. आणि त्याला कौटुंबिक पदरही आहेत. त्यामुळेच पार्थनं राजकारणात येऊ नये असं अजित पवारांनी म्हटल्यानंतरही आणि शरद पवारांनी आमच्या कुटुंबातून नवीन कुणी लोकसभा लढणार नाही, असं जाहीर केल्यानंतरही पार्थचं नाव पुढे आलं."
तर मग हा रोहित आणि पार्थ यांच्यातील राजकीय स्पर्धेचा भाग आहे का?
तर या प्रश्नाचं उत्तर स्थानिक पत्रकार 'नाही' असं देतात. ते म्हणतात की, "पवार कुटुंबाचं बाँडिंग चांगलं आहे. आणि पवारांच्या शब्दाबाहेर कुणी जात नाही. त्यामुळे जागा जिंकून येण्याची शक्यता असल्यानेच पवारांनी ही खेळी केली असावी. त्यामुळेच एका कुटुंबातील किती उमेदवार राजकारणात असणार? लोकांमध्ये त्याचं काय इम्प्रेशन जाईल याचा विचार करूनच पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी."
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget