.
.
.

भारत विकास परिषदेचा “ स्थापना दिन व दायित्व ग्रहण” सोहळा संपन्न

Pandharpur LIVE 18 March 2019

भारतीय संकृती रुजविण्याचे कार्य करा : चितळे

पंढरपूर ( प्रतिनिधी ) :
   भारत विकास परिषद हि देशात कार्यरत स्वयंसेवी संस्था म्हणून कार्य करीत आहे. राजकारण विरहीत सेवाभावी संस्था म्हणून या कडे पाहिले जाते. समाजात भारतीय संस्कृती हि संस्कारातून जपण्याचे आणि रुजविण्याचे कार्य करा असे प्रतिपादन भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय समूहगान स्पर्धाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्ताजी चितळे यांनी प्रतिपादन केले. येथील भारत विकास परिषदेचा “ स्थापना दिन व दायित्व ग्रहण “ सोहळा संपन्न झाला. या वेळी डॉ सुरेंद्र काणे यांनी भाविप अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

      भारत विकास परिषदेच्या पंढरपूर येथील शाखेचे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. पंढरपूर स्थापना दिन सोहळा आणि भाविपच्या पदाधिकारी आणि सभासदांचा दायित्व ग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष पुणे येथील दत्त्ताजी चितळे,मुख्य अतिथी श्री विद्याधर ताठे, तर भागवताचार्य वा.न.आ.उत्पात,भाविपचे पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग,प्रांताध्यक्ष रमेश विश्वरूपे ,प्रांत महासचिव अजय लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीती होती. माधुरी जोशी यांच्या “ वंदे मातरम “ ने सुरेल सुरवात झाली. डॉ.वर्षा काणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  प्रास्ताविकात प्रांताध्यक्ष रमेश विश्वरूपे यांनी शाखा स्थापने मागची भूमिका मांडली. श्री मंदार केसकर व मुकुंद कर्वे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

या नंतर डॉ सुरेन्द्र काणे यांचा भाविप पंढरपूर शाखेचे अध्यक्षपदी,वि.मा.मिराजदार यांचा उपाध्यक्षपदी,महावीर गांधी यांचा सचिव तर अजित कुलकर्णी यांनी खजिनदार म्हणून शपथ व पदभार घेतला. तसेच भाविपचा “ चार्टर “ अध्यक्षांकडे देण्यात आला. या वेळी भागवताचार्य वा.ना.उत्पात यांनी आशीर्वादपर भाषणात भाविप कडून समर्थ राष्ट्र उभारणीचे कार्य घडो अशी अपेक्षा व्यक्त केली. पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यापासून भारतीय संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून समाजातील अनेक गरजू,निराधारांना सेवा देणार असून चांगले कार्य करून दाखवू असा विश्वास पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे यांनी यावेळी व्यक्त केला. तर परिषदेच्या प्रांतीय संघटणसचिवा सौ विप्र यांनी ,संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा ,समर्पण या परिषदेच्या पंच सुत्रीच्या आधारे काम करण्याचे सांगितले.परिषदेचे प्रांत महासचिव अजय लोखंडे यांनी पंढरपूर शाखेचे सहसचिव विठ्ठल वाघोलीकर,संघटक मंदार लोहोकरे,महिला संघटक माधुरी जोशी, सेवा प्रमुख सुनील उंबरे आणि डॉ अनिल पवार,भारत को जानो स्पर्धा प्रमुख प्रा. मेधा दाते,प्रदीप कुलकर्णी, गुरुवंदन प्रमुख मंदार केसकर,मोनिका शहा,समूहगान स्पर्धा प्रमुख स्मिता कोर्टीकर,राजेश खिस्ते यांच्या सह परिषदेच्या ४५ सभासदांनी शपथ दिली.या वेळी विद्याधर ताठे,परिषदेचे पंढरपुरचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र काणे यांनी समोयोचीत भाषण केले. या वेळी नूतन अध्यक्ष डॉ .काणे यांचा विविध स्वयंसेवी संस्था ,मान्यवरांनी सत्कार केला. या वेळी पंढरपूर पत्रकारा संघाचे अध्यक्ष तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी परिषदेचे पुणे,औरंगाबाद,सोलापूर येथील सदस्य,पदाधिकारी तसेच विविध स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते. परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन,जिल्हा संघटक सुधीर देव यांनी शुभेच्छा दिल्या तर राजेश खिस्ते,डॉ.परशुराम माने यांच्या सह उपस्थितांनी म्हणलेल्या  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget