.
.
.

श्री. विठ्ठल फार्मसी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची बेंगलोरच्या मायलान लॅब्रोटरीज् मध्ये कॅम्पस इंटव्हूवद्वारे निवड

Pandharpur LIVE 23 March 2019

अर्चना नलवडे

राहुल जाधव

पंढरपूरः-येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टीटयूट संचलीत बी. फार्मसी महाविद्यालयातील अर्चना नलावडे आणि राहुल जाधव या दोन विद्यार्थ्यांची बेंगलोरच्या ‘मायलान लॅब्रोटरीज् लिमिटेड’या औषध निर्मिती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत कॅम्पस इंटरव्यूव्हमधून निवड करण्यात आल्याची माहिती बी. फार्मसीच्या प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे यांनी दिली.
         मागील आठवड्यात (६ मार्च२०१९) दक्षिण तालुका शिक्षण मंडळ सोलापूर मधील कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात झालेल्या इंटरव्यूव्हमधून बेंगलोरस्थित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मायलान लॅब्रोटरीज् लिमिटेड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे एच.आर. अशोक इवान व त्यांच्या निवड समितीने स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मुलाखती करता आमंत्रित केले होते. स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या  गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्तआदरयुक्त संस्कृती व उत्कृष्ठ शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावीत झाली. निवड समितीच्या अंतिम प्रकियेतून फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे अर्चना दत्तात्रय नलावडे आणि राहुल नवनाथ जाधव या दोघांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

१९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी इतर शहराकडे धाव घेत होते आणि शिक्षणाची गरज ओळखून ग्रामीण भागातील नागरिकांचा पैसा आणि वेळेची बचत होवून अपेक्षित उच्चशिक्षण मिळावे या हेतूने स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे आणि स्वेरीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी २००६ साली बी. फार्मसीची स्थापना केली. अभियांत्रिकीच्या पावलावर पाऊल ठेवून बी. फार्मसी देखील यासास्वी वाटचाल करत आहे. प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये उकृष्ठ निकाल, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे  हे दिसून येत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे व बी.फार्मसीचे ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. श्रीनिवास माने यांच्या नेतृत्वाखाली इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये देखील यश मिळत आहे. फार्मसीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होण्यापुर्वीच विद्यार्थांच्या हाती मायलान लॅब्रोटरीजचे नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, तसेच प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल, इतर प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget